पोलिसांचा खुलासा मागविला : अभियंत्याला बांधल्याचे प्रकरण
जळगाव : महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मोहम्मद फारुख शेख यांना दोरीने बांधून ठेवल्याच्या प्रकरणात आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांनी बुधवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश छाया पाटील यांच्या न्यायालयात दाखल केला. त्यावर न्यायालयाने १ एप्रिल रोजी पोलिसांचा खुलासा मागविला आहे.
आमदार मंगेश चव्हाण व इतर २५ जणांचा अर्ज ॲड. गोपाळ जळमकर, तर ॲड. अकील इस्माईल यांनी चांगदेव तुकाराम राठोड, भास्कर लखा पाटील, बदामराव श्रावण पाटील, अशोक पुंडलिक पाटील, संजय रतनसिंग पाटील व संजय भास्कर पाटील या सहा जणांचा अर्ज दाखल केला.
दुसऱ्या दिवशीही सर्व संशयित जळगावातच
जळगाव कारागृहात जागा नसल्याने नाशिक कारागृहात पाठविण्याचे आदेश न्यायालयाने मंगळवारी दिले होते; परंतु त्यांना जळगाव कारागृहातच ठेवण्यात आले. बुधवारीदेखील सर्व संशयित जळगावातच होते. पोलिसांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी सरकार व बचाव पक्षाकडून युक्तिवाद होईल.