जळगाव : मनपाला संपूर्ण शहर हगणदरीमुक्तीसाठी शासनाकडून 31 मार्चची ‘डेडलाईन’ देण्यात आलेली असली तरीही आयुक्तांनी 15 मार्चर्पयतच हे काम पूर्ण करण्याच्या सूचना मंगळवारी झालेल्या सर्व अभियंत्यांच्या तसेच विभागप्रमुखांच्या बैठकीत दिल्या. दरम्यान शहरात 58 ठिकाणी असलेल्या हगणदरीपैकी अद्यापही 32 ठिकाणची हगणदरी कायम असल्याने एवढय़ा कमी कालावधीत हे उद्दीष्ट मनपा कसे पूर्ण करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान हे काम मार्गी लावण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून आल्याने आता प्रत्येक प्रभागासाठी एक अभियंता या कामासाठी नेमण्यात आला आहे. आयुक्त जीवन सोनवणे यांनी मंगळवारी सकाळी सर्व स्वच्छता अभियान व इतर विषयांबाबत मनपाच्या सर्व विभागांमधील 37 अभियंते तसेच सर्व विभागप्रमुखांची बैठक घेतली. त्यात सर्व स्वच्छता अभियानाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. त्यात आयुक्तांनी स्वच्छ भारत अभियान मोहीमेचा आढावा घेतला. त्यात शहरातील 58 पैकी केवळ 26 हगणदरीमुक्त करण्यात मनपा आरोग्य विभागाला यश आले असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे 32 ठिकाणची हगणदरी अद्यापही शहरात कायम आहेत. त्या तातडीने बंद करण्यासाठी प्रत्येक प्रभागाला आरोग्य निरीक्षकासह एक अभियंता देऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. ज्या प्रभागात हगणदरी नसेल त्यांना अन्य प्रभागांमध्ये अतिरिक्त जबाबदारी देऊन हगणदरीमुक्तीचे काम तातडीने पूर्ण करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. सर्व शासकीय कामांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन50 लाखांवरील सर्व कामांचे तसेच सर्व शासकीय कामांचे थर्ड पार्टी इन्स्पेक्शन करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच नागरिकांकडून आलेले अजर्, शासकीय पत्र संबंधीत अधिका:याने 1 महिन्याच्या आत निकाली काढणे बंधनकारक केले आहे. अन्यथा संबंधीत अधिकारी त्यास जबाबदार राहील, असा इशाराही आयुक्तांनी दिला.
सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेवर भरमनपाने बांधलेली सार्वजनिक शौचालये बहुतांश ठिकाणी सफाईअभावी वापरली जात नाहीत. त्यामुळेच नागरिक उघडय़ावर विधी उरकतात. हे लक्षात घेऊन सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी बांधकाम विभागाचे अभियंता व आरोग्य निरीक्षकांवर सोपविण्यात आली आहे.