ऑनलाईन लोकमत
अमळनेर/पातोंडा, दि.16 - पातोंडा बसस्थानकाजवळ रविवारी दुपारी 2 वाजता एसटीच्या दोन बसची समोरासमोध धडक झाली. यात 32 प्रवाशी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इगतपुरी आगाराची नाशिक-चोपडा (एमएच 14-बीटी 4178) व चोपडा आगाराची चोपडा-धुळे शटल बस (एमएच 20-बीएल 1408) या दोन्ही बसची समोरासमोर धडक झाली. धडकेत दोन्ही बसच्या समोरच्या बाजूचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले.
अपघात होताच ग्रामस्थांनी जखमींना पातोंडा ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र ते बंद असल्याने, सर्व जखमींना अमळनेर ग्रामीण रूगणालात आणण्यात आले.
जखमींमध्ये लिलाबाई बन्सीलाल पाटील (60, रा.खर्डी,ता.चोपडा), कामिनी नवल चौधरी (20, रा.भराडी, ता.जामनेर), मीराबाई देवीदास चौधरी (, चोपडा), गोपाल देवीदास चौधरी (35, रा.चोपडा), मनोज धर्माधिकारी (45, धुळे), पंढरीनाथ आत्माराम महाजन (27, सुरत), सुरेश पुरूषोत्तम पुराणिक (72, धुळे), राहूल संतोष गुंतवणे (23, चोपडा), वासुदेव सुकलाल कोळी (40, मांजरोद), दिनकर आनंदा भदाणे (79, पातोंडा), सुनील कंवरलाल जैन (45, चुंचाळे), विष्णू तुफान पावरा (6, आमल्यापाणी),जानकीबाई तुफान कोळी (25, आमल्यापाणी), इंदूबाई आनंदराव कोळी (45, वढोदा),भिकन गोविंदा पाटील (40, कोंढावळ, ता.अमळनेर), ज्योत्स्ना रमेश पाटील (40, महिंदळे, ता.भडगाव), आशाबाई अभिमन पाटील (45, महिंदळे, ता.भडगाव), रजूबाई भास्कर पाटील (50,हिसाळे), संजय उखडरू शिंदे,25 नागलवाडी),विमलबाई नामदेव बागूल (45, मालेगाव), पार्वताबाई सहादू धमाळ (62, चोपडा), विमलबाई संतोष भिल (45, जानवे), विजय पाटील (35,), मनीषा पाटील (30, अमळनेर), सचिंद्र जाधव (25, नरवाडे, धुळे) आदींचा समावेश आहे. या जखमींपैकी एकाला धुळ्याला हलविण्यात आले आहे. जखमींवर ग्रामीण रूग्णालयात डॉ. प्रकाश ताळे, डॉ. जी.एम.पाटील आदींनी उपचार केले.