लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात रविवारी ३३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली, तर एका बाधिताचा मृत्यू झाला. यासह ग्रामीण भागात २८ रुग्ण आढळून आले आहेत. ६५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील एकूण रुग्णसंख्या ३२,४५३ झाली असून, यापैकी ३१,३०१ रुग्ण बरे झाले आहेत. जीएमसीत सलग दुसऱ्या दिवशी ७ जणांचा मृत्यू झाला.
रविवारी ४९७९ ॲन्टिजन चाचण्या झाल्या, तर २९४२ आरटी-पीसीआरचे अहवाल आले. यात १२७ जण बाधित आढळून आले. ॲन्टिजनचे २३५ रुग्ण समोर आले आहेत. ७६९ अहवाल प्रलंबित आहेत. मृतांमध्ये जळगाव शहरातील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. यासह जामनेर तालुक्यात ३, जळगाव तालुक्यात २, चाळीसगाव, भडगाव, धरणगाव या ठिकाणी प्रत्येकी एका बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ९ मृत्यूपैकी ७ मृत्यू हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुणालयात तर २ मृत्यू चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात झाले आहेत. शासकीय रुग्णालात शनिवारी ९ जणांचा मृत्यू झाला.
ही पाच तालुके दहाच्या खाली
पाचोरा - २
भडगाव - २
एरंडोल - २
पारोळा - ७
रावेर - ८