भुसावळ : रेल्वेच्या प्रदीर्घ सेवेनंतर भुसावल रेल्वे विभागातून ३१ रोजी ३३ रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत कर्मचाऱ्यांना रेल्वेतर्फे ७ कोटी ९२ लाख त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले.या सेवानिवृत्तीसंदर्भात रेल्वेद्वारा वर्चुअल ऑनलाईन सेवानिवृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जाहीर समारंभ न घेता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान व्हर्चुअल ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. तसेच त्यांच्या सेवेच्या कार्यालयात रेल्वे प्रतिनिधी म्हणून नांदगाव, भुसावळ, मनमाड, नाशिक, बडनेरा, बऱ्हाणपूर इ. ठिकाणी कल्याण निरीक्षकांनी जाऊन पी.पी.ओ फोल्डर दिले. सेवानिवृत्तीबद्दल कर्मचाऱ्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापक विवेककुमार गुप्ता, वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे, रेल्वे स्कूल प्राचार्य सतीश कुलकर्णी यांनी संबोधित करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक कार्मिक अधिकारी बी.एस.रामटेके यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी निपटान, लेखा विभाग तसेच सर्व कल्याण निरीक्षक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
भुसावळ विभागातील ३३ रेल्वे कर्मचारी सेवानिवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:57 PM