३ लाख ग्राहकांनी भरले ऑनलाईन वीजबिल
जळगाव : लघुदाब वर्गवारीतील वीजग्राहकांना घरबसल्या वीजबिलांचा ऑनलाईनभरणा करण्याची सुविधा महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार जळगाव परिमंडळात २लाख ९४ हजार ग्राहकांनी ऑनलाईन वीजबिल भरले आहे. यातून ५८ कोटी ३८ लाख रुपये महावितरणच्या तिजोरीत जमा झाले आहेत.
शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या बाहेरील कामाला सुरुवात
जळगाव : शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या जिल्हा परिषदे समोरील बाहेरील कामाला बुधवार पासून सुरुवात करण्यात आली. रस्त्यावर खोदकाम केल्यामुळे जिल्हा परिषदेकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. परिणामी यामुळे टॉवर चौकात वाहतूक कोंडी झाली होती.
३१मार्च ची जिल्हा परिषदेत धावपळ
जळगाव : आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने जिल्हा परिषदेत बुधवारी सकाळ पासून कर्मचाऱ्यांची रखडलेली कामे पूर्ण करतांना धावपळ दिसून आली. जिल्हा परिषदेचे सीईओ बी. एन.पाटील यांनीदेखील दुपारी विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन, तातडीने प्रलंबित कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. रात्री उशीरापर्यंत कर्मचारी कामकाज करताना दिसून आले.
जिल्हा परिषदसमोर वाहतूक कोंडी
जळगाव : शिवाजी नगर उड्डाणपुलाच्या कामामुळे बुधवारी जिल्हा परिषदेकडून टॉवर चौकाकडे जाणारा रस्ता बंद झाल्याने, परिणामी जिल्हा परिषदे समोर वाहनांची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे जि.प. कडे येणाऱ्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांना रस्त्यावरच उतरून यावे लागले. बुधवारी दिवसभर या ठिकाणी कोंडी उदभवली.