जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूने अक्षरश: थैमान घातले असले तरी, बरे होण्याचे प्रमाणही समाधानकारक आहे. काही दिवसांपूर्वी दिवसाला शंभरावर कोरोना पोहोचलेली कोरोना बाधितांची संख्या ही आता कमी झाली आहे. तर बुधवारी पुन्हा नवीन ३४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून आता जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या १८८५ इतकी झाली आहे.पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहर १९, जळगाव ग्रामीण ०६, यावल, रावेर, पारोळा प्रत्येकी ०२ तसेच पाचोरा, जामनेर, चाळीसगाव प्रत्येकी ०१ रूग्णांचा रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या १८०४ इतकी झाली आहे.अशी आहे बाधितांची संख्याजळगाव शहर - ३४६भुसावळ - ३२७अमळनेर - २३६रावेर - १४२चोपडा- १४१पारोळा- १०१यावल - १००भडगाव - ९५धरणगाव - ९१जामनेर - ८७जळगाव ग्रामीण- ६३एरंडोल - ५६पाचोरा- ४६चाळीसगाव - १९मुक्ताईनगर -१५बोदवड- १४बाहेरील जिल्ह्यातील- ०६
जिल्ह्यात आढळले नवीन ३४ कोरोना बाधित रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 6:15 PM