जळगाव : शहराला १ हजार कोविशिल्ड तसचे २४०० कोव्हॅक्सिनचे डोस मिळाल्याने सोमवारी शहरातील महापालिकेचे तसेच रोटरी, रेडक्रॉस ही केंद्र सुरू राहणार आहे. कोविशिल्डसाठी मात्र पहिला डोस बंदच असून या साठ्यातून केवळ दुसरा डोस दिला जाणार आहे. रविवारी शहरातील सर्वच केंद्र बंद होती.
दरम्यान, केंद्रांवर होणारा ऑफलाइन व ऑनलाइनचा गोंधळ दूर करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. चेतनदास मेहता रुग्णालयात शनिवारी प्रचंड गोंधळ उडाला होता. दुपारी दोन वाजेपर्यंत हा गोंधळ सुरू होता. दरम्यान, सोमवारी आणखी काही प्रमाणात जिल्ह्याला लसींचे डोस प्राप्त होणार आहे. मात्र, यात सर्व डोस हे ग्रामीण भागाला दिले जाणार असल्याची माहिती आहे. ग्रामीण भागाला काही दिवसांपासून डोसचा पुरवठा नव्हता.