लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात आता ११ हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लस दिली जाणार असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जिल्हा परिषदेच्या औषधनिर्माण शास्त्र विभागाच्या भांडारातून ३४०० डोस ६ वितरीत करण्यात आले. चाळीसगावच्या केंद्राची रुग्णवाहिका सर्वात शेवटी सहा वाजता हे डोस घेऊन रवाना झाली.
असे मिळाले डोस
प्रत्येक केंद्रांकडून मागणी नोंदविण्यात आली होती. त्यानुसार साधारण पाच ते दहा दिवस जातील असा पुरवठा करण्यात आला आहे. अद्याप २०९२० डोस औषध भांडारात शिल्लक असून त्यांचे टप्प्या टप्प्याने वाटप होणार आहे. दरम्यान, एका कुपी मध्ये दहा डोस होतात. त्यानुसार महापालिकेला हजार डोस म्हणजे शंभर कुपी देण्यात आल्या आहेत. त्या देण्यासाठी एक हजार ५० सिरीनही देण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी ठरविल्यानुसार नियोजनाने हे डोस ठरवून त्यांचे वितरण करण्यात आले आहे. महापालिकेला किमान हजार डोस देणे बंधनकारक होते.
असे केंद्र असे डोस
मनपा रुग्णालय - १०००
चोपडा ग्रामीण रुग्णालय - ५५०
जामनेर ग्रामीण रुग्णालय - ४५०
भुसावळ एम डी हॉस्पीटल - ५५०
पारोळा कुटीर रुग्णालय -४००
चाळीसगाव ग्रामीण रुग्णालय - ४५०