ऑनलाईन प्रश्नमंजूषा परीक्षा
जळगाव : स्कूल कनेक्ट उपक्रमातंर्गत शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमाची माहिती मिळावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे. सहभागी विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी बुकोपेडीयावर वेबिनार
जळगाव : केवळ दोन गोष्टी व्यक्तीला बुद्धिमान बनवतात़ त्या म्हणजे, त्याने वाचलेली पुस्तके आणि दुसरे म्हणजे प्रसिद्ध लोकांना भेटणे, असे प्रतिपादन पंकज व्यवहारे यांनी केले.
आयएमआर महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी बुकोपेडीया विषयावर वेबिनार घेण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आपली अर्थव्यवस्था ही सुध्दा ज्ञानाधारित आहे. म्हणून, आपण आपले ज्ञान वाढविले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी १८ पुस्तकांचे माहितीपर सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. डॉ. शुभदा कुळकर्णी यांनी केले.
१ ऑगस्टला नीट परीक्षा
जळगाव : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) या प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येत्या १ ऑगस्ट रोजी ही परीक्षा होणार असून हिंदी व इंग्रजीसह ११ भाषांमध्ये ही परीक्षा होईल.
सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
जळगाव : केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे क्रांतिज्योती, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमापूजन डॉ. कुंदा बावीस्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य अशोक राणे, प्रा.संदीप केदार, ग्रंथपाल मनीष वनकर, संजय जुमनाके व मोहन चौधरी आदी उपस्थित होते.