लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जुन महिना संपत आला तरी जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३५.३७ टक्के जलसाठा असून गिरणा धरण तर ३२.१७ टक्क्यांवर आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून जोरदार पाऊस होत असल्याने गिरणा व वाघूर धरण १०० टक्के भरले गेले. त्यामुळे या दोन्ही मोठ्या प्रकल्पांपैकी वाघूर धरणात ६०.२९ टक्के जलसाठा आहे तर गिरणा धरणात ३२.१७ टक्के जलसाठा आहे. हतनूर धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने दररोज धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या या धरणात १७.६५ टक्के जलसाठा आहे. तीनही धरणात उपयुक्त साठा १२.८३ टीएमसी आहे.
यंदा सलग पाऊस होत नसल्याने धरण साठ्यांमध्ये फारसी वाढ होत नसल्याने सलग दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे.