मुक्ताईनगर : शहरातील छत्रपती उद्यानालगत भाजी विक्रेत्यांसह ब:हाणपूर रोडवरील जुने तलाठी कार्यालयालगतचे अतिक्रमण रविवारी ग्रामपंचायतीच्यावतीने हटवत दोन्ही ठिकाणावरील सुमारे 35 अतिक्रमित व्यावसायिकांची दुकाने हटवल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला़ चौफुल्ली अर्थातच प्रवर्तन चौकालगतचा परिसर गेल्या 25 वर्षापासून लहान-मोठे व्यावसायिकांसाठी अतिक्रमणाचा शो-पीस ठरला आहे. अतिक्रमणात व्यावसायिकाची सांगड बसत नाही तोर्पयत पुन्हा अतिक्रमण काढण्याचे भूत मानगुटीवर बसत़े असे करताना गेल्या कालखंडात लहान-मोठय़ा प्रमाणात पाचव्यांदा येथे अतिक्रमण काढण्यात आल़े कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिक्रमणामुळे वाहतुकीस होणारा अडथळा येत असल्याने पोलीस प्रशासनाने ग्रामपंचायतीस पत्र दिल्याने अतिक्रमण काढण्यात आल्याचे बोलले जात आल़े तसेच भाजी विक्रेत्यांना बोदवड रस्त्यावरील अलंकार एम्पोरिएमसमोर ताप्तुरत्या स्वरुपात वापरण्यास देण्यात आलेल्या जागेवरून असुविधांमुळे भाजी विक्रेत्यांनी काढता पाय घेत छत्रपती शिवाजी महाराज उद्यानालगत महाजन मेडिकलसमोरील जागेत भाजीपाला मंडी भरविली व असे करताना एका भाजीपाला विक्रेत्यावर अन्याय झाला त्याला जागाच दिली नाही. ग्रा.पं.पदाधिका:यांनी भाजी विक्रेत्यांना आपसात समझोता करून अन्याय झालेल्या विक्रे त्यास जागा देण्याबाबत तोडगा मांडला पण ही सांगड काही बसली नाही. परिणामी न्याय म्हणून रविवारी अतिक्रमण काढण्यात आल्याची चर्चा आह़ेसोमवारपासून भाजी विक्रेत्यांना नव्याने जागा आखणी करून पुन्हा भाजी बाजार भरेल, अशी अपेक्षा वजा तोडगा पुढे आला आहे. हा विषय कागदावर नसला तरी खलबते यावरच रंगले आहेत आणि निष्कर्ष ही तोडगा काढणा:यांच्या चर्चेतून बाहेर आला आहे. (वार्ताहर)
35 दुकानांचे हटवले अतिक्रमण
By admin | Published: January 09, 2017 12:14 AM