कुंदन पाटील
जळगाव : स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरील दुकाने उपलब्ध करून देणारी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ३५ हजार दिव्यांगांना आता फिरत्या दुकानांचे मालक बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यातून अनेकांना स्वयंरोजगार उपलब्ध होणार आहे.
दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगारनिर्मितीस चालना देणे, दिव्यांग व्यक्तीचे आर्थिक- सामाजिक पुनर्वसन करणे, सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या परिवारासोबत जीवन जगण्यास सक्षम करणे, असा योजनेचा उद्देश आहे. राज्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण स्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन ई- व्हेईकल)मोफत उपलब्ध करून देण्याबाबतच्या योजनेची अंमलबजावणी संदर्भाने दिव्यांग अर्जदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्या करिता सदर नोंदणी पोर्टल https://evehicleform.mshfdc.co.in यावर दि.०४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
तालुकानिहाय दिव्यांगअमळनेर-३७५३भडगाव-१५९०भुसावळ-२४६३बोदवड-६५९चाळीसगाव-१९६२चोपडा-१९४०धरणगाव-११८०एरंडोल-२३५३जळगाव-४०३५जामनेर-४०६४मुक्ताईनगर-१४४८पाचोरा-२४३७पारोळा-१४२९रावेर-३४३७यावल-२३०१एकूण-३५०८७