शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पाचोरा शहरातील ३५००अतिक्रमित घरे नावावर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 16:27 IST

सोमवारपासून ईपीएस मोजणी प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.

पाचोरा : शहरातील पालिका क्षेत्रातील अतिक्रमितधारक रहिवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली अतिक्रमित घरे रहिवाशांच्या स्वतःच्या नावावर लावण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शहरातील सुमारे ३५०० अतिक्रमित घरे नियमानुकूल होणार आहेत.आमदार किशोर पाटील व पाचोरा पालिकेच्या पुढाकाराने येत्या सोमवारपासून शहरातील विविध भागातील १८ ठिकाणी वसलेल्या नागरिकांच्या घरांच्या मोजणी प्रक्रियेला इपीएस प्रणालीद्वारे गती देण्यात येणार आहे. आमदार पाटील यांनी शुक्रवारी भूमी अभिलेख व पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या संयुक्त बैठकीत याबाबतचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या दि} १७ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार सन २०११ व त्याआधीचे अतिक्रमण नियमनाकुल करण्याचे धोरण आहे. याबाबत पाचोरा पालिकेने पुढाकार घेतला आहे. पाचोरा शहरातील बाहेरपुरा, बहिरमनगर, बंजारा वस्ती, भीमनगर, भोईवाडा, गोंडवस्ती, हनुमान नगर, जनता वसाहत, कुर्बान नगर, महात्मा फुले नगर, माहेजी नाका, मिलिंद नगर, नागसेन नगर, दसेरा मैदान (मोंढाळा रोड), रसूलनगर, श्रीरामनगर, वंजारवाडी, वरखेडी नाका भागातील सुमारे ३५०० घरे पालिकेच्या नोंदीप्रमाणे अतिक्रमित असून याच्या मोजणी प्रक्रियेला सुरुवात होत आहे. यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाच्या मदतीसाठी पालिकेचे बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता मधुकर सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता हिमांशू जैस्वाल, सहाय्यक प्रकाश पवार, लास देवरे यांच्यासह कर्मचारी मदत करणार असून, त्यामुळे मोजणी प्रक्रियेस गती मिळणार आहे.भडगाव शहरातीलदेखील २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांची यादी करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. आगामी २-३ दिवसात यशवंत नगर भागासह संपूर्ण भडगाव शहरातील घरेदेखील पाचोऱ्याच्याच धर्तीवर नियमित करण्यात येणार आहे.शुक्रवार, २९ रोजी सकाळी १० वाजता आमदार किशोर पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुकुंद बिल्दीकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रवीण ब्राह्मणे यांच्यासह मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक भगवान भोये, शहर भूमापक पी.व्ही.कुलकर्णी, नगररचना विभागाच्या मानसी भदाणे यांच्यासह पालिका व भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.राज्य शासनाच्या धोरणानुसार २०११ पूर्वीच्या अतिक्रमणधारकांची घरे स्वतःच्या नावावर लावण्यासाठी पाचोरा पालिकेने पुढाकार घेतला असून, यासाठी मोजणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे. यासाठी लागणारी रक्कम निश्चित करून त्यावर निर्णय घेतला जाईल. याच धर्तीवर भडगाव शहराचेदेखील अतिक्रमण नियमनाकुल केले जाईल. भडगाव शहरातील अतिक्रमणधारकांची यादी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. -किशोर पाटील, आमदार, पाचोरा-भडगाव
टॅग्स :nagaradhyakshaनगराध्यक्षPachoraपाचोरा