शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

मेहरूण तलावावर ३७ जाती-प्रजातींच्या पक्ष्यांची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 6:41 PM

जागतिक स्थलांतरीत पक्षी दिन : ४९६ पक्षी आढळले तलावावर

ठळक मुद्दे१९ नागरिकांचा सिटीझन साइंटीस्ट म्हणून सहभाग

जळगाव- जागतिक स्थलांतरीत पक्षी दिनानिमित्त निसर्ग मित्रांतर्फे शनिवारी मेहरूण तलावावर पक्षी निरिक्षण व गणनासह प्लॅस्टिकचे घातक परिणाम यावर प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात आला. पक्षी गणननेमध्ये मेहरूण तलावावर ३७ विविध जाती-प्रजातींच्या पक्षींची नोंद घेण्यात आली असून विदेशी स्थलांतरीत पक्षी मात्र आढळून आलेले नाहीत.निसर्ग मित्र आणि पक्षी मित्रांनी मेहरूण तलावावर सकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत पक्षी गणना केली़ यावेळी १९ पक्षी प्रेमी नागरिकांनी सिटीझन साइंटीस्ट म्हणून आपला सहभाग नोंदविला. अडीच तासाच्या गणनेमध्ये ३७ विविध पक्षींच्या जाती-प्रजाती तलावावर आढळून आल्या़ यावेळी संख्या एकूण गणना केली असता तब्बल ४९६ पक्षी याप्रसंगी आढळून आले़ मात्र, हे सर्व पक्षी स्थानिक स्थलांतरीत असल्याचे पक्षी मित्रांना दिसून आले.सन २००६ पासून जगभरात वर्षातून दोनदा स्थलांतरीत पक्षी दिन साजरा केला जातो. आॅक्टोबर महिन्याच्या आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हा दिन साजरा करण्यात येतो. हा दिन साजरा करण्यासाठी दरवर्षी नवीन संकल्पना राबवण्यात येते. या वर्षी प्रोटेक्ट बर्ड, बी अ सोल्यूशन टू प्लॅस्टिक पोल्यूशन हे घोषवाक्य घेऊन हा दिन साजरा करण्यात आला़ स्थलांतरीत पक्षांमध्ये मुख्यत: पाणथळ पक्षी मोठ्या प्रमाणावर असतात. समुद्र, नदी, तलाव या त्यांच्या महत्वाच्या अधिवासांना घेरणारा प्लॅस्टिक कचरा तसेच प्रचंड तापमानामुळे आटत चालेले जलस्त्रोत हे पक्षांच्या अस्तित्वास अत्यंत धोकादायक ठरत आहे. याच संकल्पनेवर आधारित निसर्ग मित्रतर्फे प्लॅस्टिक, पक्षी व एकूण प्राणीजगत, पर्यावरणावर होणाºया घातक परिणामांची माहिती पक्षीमित्र शिल्पा गाडगीळ व राजेंद्र गाडगीळ यांनी दिली.यांचा होता सहभागमेहरूण तलावावर राबवण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण व पक्षी गणना या उपक्रमात हेमलता पाटील, वेदश्री पाटील, योगेश सोनार, नारायण सोनार, चेतन वाणी, सुमित माळी, सुधाकर माळी, सोमेश वाघ, धनश्री बागुल, गोकुळ इंगळे, मुकेश कुरील, कृष्णाकुरील, विलास बर्डे, चिन्मय बारुदवाले, रेवीन चौधरी, सुमेध सोनावणे यांनी सहभाग घेतला. या गणनेत प्रामुख्याने छोटा पाणकावळा, गाय बगळा, छोटा बगळा, मध्यम बगळा, ढोकरी, हळदी-कुंकू बदक, वारकरी, टिबुकली, कंठेरी चिलखा,नदी सुरय, शेकाट्या हे पाणथळ पक्षी त्याचबरोबर वृक्ष निवासी निळ्या शेपटीचा वेडा राघू या स्थलांतरीत पक्षाची नोंद झाली.

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव