लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोव्हॅक्सिन लस एकाच दिवसात संपल्याने रविवारी पुन्हा चेतनदास मेहता रुग्णालयातील केंद्र सुरू राहणार आहे. तर महापालिकेच्यास सहा केंद्रांसह रोटरी व रेड क्रॉस या दोन केंद्रांवर कोविशिल्ड लसीचे दोनही डोस उपलब्घ राहणार आहेत. दरम्यान, कोव्हॅक्सिन लसीचे ३७०० डोस हे रविवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्याला प्राप्त होणार असून सोमवारी ते केंद्रांवर उपलब्ध होणार आहेत.
कोव्हॅक्सिन लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे काही केंद्र सुरू असतात तर काही बंद अशी स्थिती असून रोज हे चित्र बदलत आहे. रविवारी महापालिकेचे छत्रपती शाहू हॉस्पीटल, डी. बी. जैन रुग्णालय, शाहीर अमर शेख रुग्णालय, नानीबाई अग्रवाल हॉस्पीटल, मुलतानी हॉस्पीटल, पिंप्राळा मनपा शाळा क्रमांक ४८ हे सहा केंद्र सुरू राहणार आहे. या ठिकाणी कोविशिल्ड लस उपलब्ध असल्याची माहिती प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी दिली.