चंद्रशेखर जोशीजळगाव : ‘घर पहावे बांधून अन् लग्न पहावे करून’ असे म्हटले जाते... वधू-वर पित्याला लग्नासाठी खर्चाचा प्रचंड आर्थिक भार उचलावा लागतो. आमंत्रणे देता-देता नाकेनऊ येतात. ही कसरत लक्षात घेऊन आता नोंदणी विवाहाला दिवसेंदिवस पसंती वाढत आहे. अवघ्या ११ महिन्यात ३७५ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला आहे.जात- पोटजात, पत्रिका जुळविणे. त्या जुळल्या की मुला-मुलीची व पालकांची पसंती ते आटोपत नाही तर घेण्या-देण्याची बोलणी त्यात जमले की मग साखरपुडा व नंतर लग्नाच्या तारखेची निश्चिती असे एक ना अनेक प्रकार असतात. हा टप्पा पार पडला की सुरू होते प्रत्यक्ष लग्नाची तयारी. मग मंगल कार्यालय शोधा, वाजंत्री, मुला-मुलीचा व मानाचे कपडे, जेवणावळीची तयारी, मिरवणुकीसाठी घोडा व बग्गी, मानाच्या मंडळींकडे जाऊन आमंत्रणे देणे ही प्रक्रिया जवळपास महिनाभर चालत असते. वेळेचा व पैशांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय या काळात होत असतो.हा होणारा त्रास लक्षात घेऊन हळूहळू या सर्व पद्धतींना फाटा देण्याचा प्रयत्न होऊ लागला आहे. यासाठी उपलब्ध असलेली कायदेशिरपद्धती म्हणजे नोंदणी विवाह. जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या नोंदणी कार्यालयाकडे अनेक वधू-वर पित्यांची पावले वळत आहे. नोंदणी पद्धतीला पसंती देऊन रूढी परंपरा, खर्च याला फाटा देताना दिसून येतात.नोंदणी कार्यालयाकडून घेतली असता ११ महिन्यात ३७५ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी (२०१७) मध्ये ३७७ जणांनी नोंदणी पद्धतीने विवाह केले होते. यावर्षी हा आकडा ८०० च्यावर जाण्याचीच शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.महिनाभरात ४३४ विवाह होणारदिवाळीनंतर बरेच विवाह मुहूर्त असतात. साधारणत: तुळशी विवाह आटोपला की लग्नांची धामधुम सुरू होते. त्यानंतर डिसेंबर महिन्यात लग्न करायचे म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील नोंदणी (मुद्रांक) कार्यालयात ४३४ जणांनी नोटीस दिल्या आहेत.आॅन लाईनची सुविधापूर्र्वी कागदपत्रांची पूर्तता व अन्य कामे करण्यासाठी नोंदणी कार्यालयाच्या खेट्या घालाव्या लागत असत. आता त्यातही प्रगत तंत्रज्ञान आले आहे. अगदी परदेशात असले तरी तेथून एक महिना अगोदर आॅनलाईन नोटीस देऊन नोंदणी विवाहपूर्वीची प्रक्रिया पार पाडू शकतात. सर्वच खर्चिक बाबींना व कायदेशिर आधार प्राप्त होणाऱ्या पद्धतीला आता दिवसेंदिवस पसंती वाढत आहे.
नोंदणी पद्धतीने विवाह करणाºयांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, ही एक चांगली बाब आहे. नागरिकांना विवाह नोंदणीसाठी एक महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. मात्र आता कार्यालयापर्यंत येण्याची गरज नाही. आॅन लाईन सुविधेचा अगदी घरात बसून लाभ घेता येतो. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा.- सुनील पाटील, सह जिल्हा दुय्यम निबंधक, जळगाव.