बोदवड : शहरासह बोदवड तालुक्यातील 38 गावांना उन्हाळ्याच्या पाणीटंचाईचे चटके हिवाळ्यात बसायला सुरुवात झाली आहे. बोदवड शहरातील प्रभागांमध्ये 10 दिवस उलटले तरी अजून नळांना पाणी आले नसल्याची स्थिती सर्वच प्रभागात आहे. त्यामुळे हिवाळ्यातही पाणीटंचाईचा सामना शहर व तालुकावासीयांना करावा लागत आहे.बोदवड शहरासह तालुक्यातील 38 गावांची तहान ओडीएची प्रादेशिक पाणीपुरवठा योजना भागवत आहे. परंतु सन 2006 मध्ये कालबाह्य झालेली ही योजना अजूनही अंतिम घटकेतही पाणीपुरवठा करीत आहे. या योजनेवरील पंपिंग करणारे तीन पंप आहेत. त्यापैकी दोन पंप अत्यंत जीर्ण झाल्याने बंद पडले होते. त्या ऐवजी अहमदाबाद येथील कंपनीकडून दोन पंप माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून निधी मिळवून बसविण्यात आले आहेत. तर या तिन्ही पंपातून 24 तासात 1.22 (एम.एल.डी.) कोटी लीटर पाणी पंपातून म्हणजेच तासाला एक पंप तीन लाख 86 हजार लीटर पाणी उपसत असून ते साठवण टाकीर्पयत पोहचवले जात आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून नव्याने बसविण्यात आलेले दोन्ही पंप फक्त दोन लाख ते अडीच लाख लीटर पाणी शुद्ध करीत असल्याने तासाला सुमारे 20 हजार लीटर पाणी (ओव्हर फ्लो) वाया जात आहे. नवीन पंपांच्या तुलनेत जुना 110 अश्वशक्तीचा पंप मात्र तीन लाख 86 हजार लीटर पाणी शुद्ध करीत आहे. गत आठवडय़ात नवीन पंपातील एका पंपात बिघाड झाल्याने पूर्ण यंत्रणा बंद पडली होती तर आता पुन्हा पंप दुरुस्तीला सुरुवात झाली आहे. पंरतु पूर्ण क्षमतेचे पाणी शुद्ध होत नसल्याने पाणीपुरवठा होण्यास अडचण निर्माण होत आहे. गळतीशिवाय दिवसाकाठी पंप हाऊस केंद्रातूनच लाखो लीटर वाया जाणा:या पाण्यामुळे ऐन हिवाळ्यात ही अडचण निर्माण झाली आहे.एकंदरीत कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या नवीन पंप क्षमतेपेक्षा जास्त पाणी फेकत नसल्याने बोदवड शहरासह 38 गावांना येणारा उन्हाळ्यार्पयत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाली आहे.पाण्यासाठी : गृहिणींची वणवण.4बोदवडसह ग्रामीण भागाती रहिवाशांची थंडीच्या दिवसातही पाण्यासाठी वणवण होत आहे विशेष करुन गृहिणींना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना ओडीएच्या सारोळा केंद्रात मात्र दररोज मोठय़ा प्रमाणावर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.क्षमतेपेक्षा कमी पाणी पपींग होत होते परंतु दुरूस्ती नंतर तीन लाख 86 हजार लीटर र्पयत पाणी आता उचल होत आहे. अडचण सुटणार आहे. परंतु भविष्यात व उन्हाळय़ात पंपिगमध्ये बिघाड झाल्यास दोन पंप सुरळीत राहिल्यास अडचण येणार नाही मात्र दोन पंप बंद पडल्यास कंपनीचे पथक व पंप आल्या शिवाय पंपिंगला अडचण ठरू शकते.- प्रवीण सोनवणे, वीजतंत्री सारोळा केंद्र
38 गावांना हिवाळ्यातही पाणीटंचाई
By admin | Published: February 03, 2017 12:45 AM