चाळीसगाव, जि.जळगाव : ज्वारी, मका आणि बाजरी या भरड धान्य खरेदीसाठी शासकीय नोंदणी सुरू झाली आहे. शुक्रवारअखेर ३९२ शेतक-यांनी विक्रीसाठी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या शेतक-यांना तात्काळ टोकनही दिले जात असून अॉनलाईन प्रक्रिया देखील पूर्ण केली जात आहे.यावर्षी प्रथमच तालुक्यातील भरड धान्याची खरेदी भडगाव शेतकरी सहकारी संघामार्फत होत आहे. येथील बाजार समितीच्या आवारातील शेतकरी निवासमध्ये ही नोंदणी २ पासून सुरू करण्यात आली आहे. गत ११ दिवसात तालुक्यातील ३९२ शेतक-यांनी भरड धान्य विक्रीसाठी उता-यासह नोंदणी केली आहे. नोंदणीचे काम भडगाव शेतकरी सहकारी संघातील कर्मचारी वसंतराव बाविस्कर, अवधूत देशमुख, दिलीप नरवाडे, महेश शितोळे करीत आहे.भरड धान्य निहाय नोंदणी केलेले शेतकरीधान्य प्रकार नोंदणी संख्यामका ३०६ज्वारी ४७बाजरी ४९एकुण शुक्रवार अखेर नोंदणी ३९२आमदारांच्या तक्रारीची दखलगतवर्षी चाळीसगाव शेतकरी सहकारी संघाकडून भरड धान्य खरेदीत घोळ झाल्याचा प्रकार आमदार मंगेश चव्हाण यांनी समोर आणला. यानंतर त्यांनी थेट पणन मंत्री व पणन संचालकांकडे याबाबत लेखी तक्रार केली होती. टाळेबंदी असतांना शेतक-यांसोबत रस्त्यावर उतरुन आंदोलनही केले होते. आमदारांच्या तक्रारीची दखल घेऊन यावर्षी चाळीसगाव तालुक्यातील भरड धान्य खरेदीचे काम भडगाव संघाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार २ पासून नोंदणी सुरु झाली आहे.पारदर्शी नोंदणी आणि खरेदीहीभडगाव संघाला भरड धान्य खरेदी पारदर्शीपणे करण्याच्या सुचना अगोदरच दिल्या आहेत. खरेदी प्रक्रिया देखील पारदर्शीच होईल. संघाचे चेअरमन प्रताप हरि पाटील यांचेही या प्रक्रियेवर लक्ष आहे.- मंगेश रमेश चव्हाणआमदार, चाळीसगाव.