जळगाव : शहरानजीकच्या कुंभारखोरी टेकडीला मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत सुमारे चार हेक्टावरील जंगल जळून खाक झाले. समतानगर, वाघनगर, नवनाथनगर आदी परिसरातील तरुणांनी मनपाचे अग्निशमन दलाचे बंब पोहचण्यापूर्वी मानवी साखळी तयार करुन शर्थीचे प्रय} करुन आग नियंत्रणात आणली. नंतर सुमारे दीडतासानंतर अग्मीशमन बंबांच्या आधारे या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यासाठी मनपा व जैन उद्योग समूहाच्या अग्नीशमन बंबांची मदत झाली. दरम्यान, या आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही़ वास्तूनगरकडून आगीला सुरवातदुपारी 3 वाजेच्या सुमारास वास्तूनगरच्या बाजूने पठाणबाबा दग्र्याच्या मागील बाजूस असलेल्या जंगलाला आग लागली. जंगलात असलेल्या कोरडय़ा गवतामुळे काही क्षणातच आगीने भीषण रूप धारण केल़े वास्तूनगर ते नवनाथनगरच्या बाजूने जंगल परिसरापर्यत आग पोहचली व टेकडीला आगीचा वेढा पडला़नवनाथनगर भागातील रहिवासी विजय सुकदेव जाधव यांनी तत्काळ महानगरपालिकेचे अग्निशमन विभागाला आगीबाबत माहिती़ वनविभागाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. रहिवाशांनी कळविल्यानंतर मनपाचे अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाल़े चालक नाशिर अली यांनी प्रसंगावधानता राखत तत्काळ कार्यवाही हाती घेतली. तसेच रोहिदास तायडे, मंगल पाटील, पुंडिलक सोनवणे यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़सर्रासपणे वृक्षतोड, तरूणांच्या पाटर्य़ा कुंभारखोरी टेकडीपासून काही अंतरावर पोलिसांचे गोळीबाराचे प्रात्यक्षिक होत़े या टेकडीला वनविभागाचे कुंपन घालण्यापलीकडे दुर्लक्ष झाले आह़े भरदिवसा सर्रासपर्ण वृक्ष तोडीसारखे प्रकार या जंगलात सुरू असतात़ मात्र वनविभागाकडून कुठलीही कारवाई होत नाही़ तसेच एकांत व उंच भाग असल्याने याठिकाणी प्रेमीयुगुल तसेच तरूणांच्या पाटर्य़ाही रंगत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांकडून मिळाली़ आगीवर नियंत्रण मिळवित असताना अग्निशमन बंब कर्मचा:यांना बियरची बाटली, सिगारेटचे पाकिटे तसेच आगपेटी आढळून आली़ धुम्रपानामुळेही ही आग लागल्याची शक्यता रहिवाश्यांकडून वर्तविण्यात येत आह़ेफाटके कपडे, मातीद्वारे तरुणांनी विझविली आगआगीची बातमी वा:यासारखी परिसरात पोहचली़ नवनाथनगरातील एकनाथ पाटील या तरूणाने जीवाची पर्वा न करता माती, झाडाच्या फांद्याच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला़ काही वेळात वाघनगर परिसरातील रहिवासी घटनास्थळी पोहचल़े मानवी साखळी तयार करून फाटके कपडे, झाडांच्या फांद्या, मातीच्या सहाय्याने आग विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न केल़े यात एकनाथ पाटील, अंकुश सोनवणे, मंगेश गांगुर्डे, धनराज पाटील, विशाल काळे, दीपक पाटील, सतीश सोनवणे, बापू सोनवणे या तरूणांचा समावेश आह़े ज्याठिकाणी पोहचता येत नव्हत़े
कुंभारखोरीचे 4 हेक्टर जंगल जळून खाक
By admin | Published: January 18, 2017 12:39 AM