चाळीसगाव, जि.जळगाव : आई फाऊंडेशन आयोजित रोजगार मेळाव्यात रविवारी तालुक्यातील जवळपास २५०० तरुणांनी सहभाग नोंदविला व त्यातील १६०० तरुणांना विविध कंपन्यांंमध्ये नोकरीचे नियुक्तपत्र मुलाखतीनंतर देण्यात आले.तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे या भूमिकेतून आयोजित या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायमूर्ती संगीतराव पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटन आई फाऊंडेशनचे मार्गदर्शक मुरलीधर कोतकर व कमल कोतकर यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.हेमांगी पूर्णपात्रे, वृक्षमित्र अरुण निकम, किसनराव जोर्वेकर, अशोक खलाणे डॉ.विनोद कोतकर, डॉ.चेतना कोतकर आदी उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात संगीतराव पाटील यांनी हा रोजगार मेळावा तरुणांना स्वावलंबी व ताठ मानेने जगायला तयार करणारा असून, अशा उपक्रमातूनच समृद्ध व संपन्न भारत उभा राहणार असून त्यांनी आई फाऊंडेशनच्या विविध कार्यक्रमांचे कौतुक केले. तरुणांनी आत्मविश्वासाने मिळेल त्या संधीचे सोने करण्याची तयारी करुन वेगवेगळ्या क्षेत्रात आपला व आपल्या कुटुंंबाचा नावलौकिक वाढवावा, असे आवाहन त्यांनी उपस्थित तरुणांना केले.मैत्रीदिनाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्व तरुणांसाठी रोजगाररुपी अनोखी भेट आई फाऊंडेशनतर्फे आज आम्हाला देताना आनंद होत असल्याचे रोजगार मेळाव्याचे आयोजक डॉ.विनोद कोतकर यांनी सांगितले. महासत्ता होण्यासाठी आपल्या देशाचे शेतकरी व तरुण हे दोन्हीही घटक स्वावलंबी होणे गरजेचे असून त्यातलाच एक छोटासा प्रयत्न म्हणजे आजचा रोजगार मेळावा असल्याचे प्रास्ताविक करताना त्यांनी यावेळी सांगितले.कार्यक्रमप्रसंगी सी.सी. वाणी, प्रदीप पुराणिक, शेखर निंबाळकर, महेश वाणी, स्वरुप देशमुख, योगेश भोकरे, दीपक पाटील, राकेश बोरसे, बी.आर.येवले, के.डी.पाटील, नीरज येवले, सचिन मोराणकर आदी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुधीर चव्हाण, मनोज कोतकर, राकेश कोतकर, मनोहर पाटील, मनोज पगार, सारंग कोतकर, गोकूळ येवले, महेश पाटील, राजमल कोतकर, योगेश मोराणकर, नाना वाणी, योगेश कासार, बाळकृष्ण मालपुरे, सीमा देवरे, फातिमा शेख, विवेक पुणेकर, विकास बागड, अनमोल नानकर, दीपक राजपूत, शीला कोळी, प्रशांत लाटे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन किशोर शिरुडे यानी केले.
चाळीसगावच्या १६०० तरुणांना मिळाली रोजगारसंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 6:25 PM
रोजगार मेळाव्यात रविवारी तालुक्यातील जवळपास २५०० तरुणांनी सहभाग नोंदविला व त्यातील १६०० तरुणांना विविध कंपन्यांंमध्ये नोकरीचे नियुक्तपत्र मुलाखतीनंतर देण्यात आले.
ठळक मुद्दे२५०० तरुणांनी नोंदविला सहभागआई फाऊंडेशनचा उपक्रम