रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील ३ व १० जून रोजी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ३० गावातील ७०५ शेतकऱ्यांच्या ४१७.४ हेक्टर क्षेत्रातील ५१.४२ टक्के केळीबागा जमीनदोस्त झाली. त्यात १६ कोटी ६९ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा पंचनाम्यांचा अंतिम अहवाल तहसीलदार उषाराणी देवगुणे, तालुका कृषी अधिकारी विजय महाजन व सहाय्यक गटविकास अधिकारी हबीब तडवी यांनी सादर केला आहे.निसर्ग वादळाच्या तडाख्याचे अंशत: पडसाद केºहाळे बुद्रूक, मंगरूळ, जुनोने, पाल व रावेर येथील १४ शेतकऱ्यांच्या १६.७६ हेक्टर पैकी ५.९२ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा बाधित होऊन २३ लाख ६८ हजारांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करून अंतिम अहवाल सादर करण्यात आला आहे.दरम्यान, तालुक्यातील निंभोरा, विवरे खुर्द, वडगाव, चिनावव कुंभारखेडा परिसरात दि १० जून रोजी दुपारी वादळी पावसाने तडाखा दिला होता. किंबहुना, अवघ्या पाच सहा तासांनी ते शमलेले चक्रीवादळाने जोरदार पावसासह घोंघावत रात्री बोरखेडा, तामसवाडी, रावेर, पुनखेडा, पातोंडी परिसरासह दसनूर, विवरे बु।।, मोरगाव बु।।, मोरगाव खुर्द, अटवाडे, वाघोड, कर्जोद, भोकरी,खिरवड, थेरोळा, धुरखेडा, भाटखेडा, कोचूर परिसरातील २७ गावातील शेतीशिवारातील ८००.१४ हेक्टर पैकी ४११.४८ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा उन्मळून जमीनदोस्त झाल्याने ५१.४२ टक्के नुकसान होवून १६ कोटी ४५ लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे पंचनामे करून आज अंतिम अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.सर्वाधिक नुकसानदरम्यान, निंभोरा बु।। येथील १८३ शेतकºयांचे १२१.२४ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा भुईसपाट होवून ४ कोटी ८४ लाख ९६ हजार रू चे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आहे. विवरे खुर्द येथील १७० शेतकºयांचे ११९.०६ हेक्टर क्षेत्रातील केळीबागा उन्मळून ४ कोटी ७६ लाख २४ हजारांचे नुकसान झाले आहे. रावेर शिवारातील १२५ शेतकºयांच्या ९६.२४ हेक्टर क्षेत्रात केळीबागा बाधित होवून ३ कोटी ८४ लाख ९६ हजारांच्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे. वडगाव येथील ४३ हेक्टर क्षेत्रात केळी बाधित होऊन ९८ लाख ८० हजार रू चे नुकसानीचा पंचनामा करण्यात आला आहे.दरम्यान, इतर २३ गावातील शेतकºयांचे नुकसानीचे बाधित क्षेत्र १० हेक्टरच्या आत आहे. दोन्ही वादळी पावसाच्या तडाख्यात ४१७.४ हेक्टर केळीबागा बाधित होऊ १६ कोटी ६९ लाख ६० हजारांचे नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहे. तद्वतच, १६ जून रोजी झालेल्या वादळी पावसातील नुकसानीचे पंचनामेही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.
रावेर तालुक्यात ३० गावातील ४१७.४ हेक्टर केळी बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 7:34 PM
३ व १० जून रोजी झालेल्या वादळी पावसाच्या तडाख्यात ३० गावातील ७०५ शेतकऱ्यांच्या ४१७.४ हेक्टर क्षेत्रातील ५१.४२ टक्के केळीबागा जमीनदोस्त झाली.
ठळक मुद्देपंचनाम्यांचा अंतिम अहवालवादळी पावसाचा फटका