जळगाव : जिल्ह्यात बुधवारी ४३ जणांना कोरोनाने बाधित झाल्याचे समोर आले आहे. त्यात शहरात १४ जण नवे बाधित आहे. तर बुधवारी एकाच दिवसात १६९ जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. जिल्ह्यात आता १०९१ उपचार घेत असलेले रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात बुधवारी २१५७ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या. तर २२१९ रुग्णांच्या अँटिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातून हे बाधित रुग्ण समोर आले आहेत. एकूण रुग्णांपैकी फक्त ७७ रुग्णांवर आयसीयूत उपचार सुरू आहेत. दुसऱ्या लाट ओसरायला लागल्यानंतर आयसीयूतील रुग्ण संख्यादेखील सातत्याने कमी होत आहे. तसेच ऑक्सिजनची गरज असलेले रुग्णदेखील १९७ आहेत.
ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत एरंडोल १०२ आणि चाळीसगाव २०१ वगळता सर्व तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या दोन आकड्यांमध्येच आहे. सर्वात कमी ॲक्टिव्ह रुग्ण हे फक्त १४ हे भडगाव तालुक्यात आहेत.