लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या तीन ते चार महिन्यांपासून शांत असलेल्या कोरोनाने १५ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात मोठी उसळी घेतली. यात मार्चमध्ये तर संसर्गाचा अक्षरश: कहर झाला असून ९ ते १६ मार्च या आठवड्यात भयावह परिस्थिती निर्माण झाली. या आठवड्यात ४५ बाधितांचा मृत्यू झाला असून, ७ हजार ४३७ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात सर्वत्र कमीअधिक रुग्ण आढळून येत आहेत. यातील काही तालुक्यांमध्ये रुग्णसंख्या ही सातत्याने शंभरापेक्षा अधिक नोंदविली जात आहे. गेल्या सहा ते सात दिवसांपासून तर सातत्याने ९५० पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. यात उपचार करणारे डॉक्टर मोठ्या प्रमाणात बाधित होत आहेत. गेल्या वर्षीपेक्षा हे संसर्गाचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या आठवडाभरात परिस्थिती अधिकच बिकट झाली असून सक्रिय रुग्णांची संख्या थेट ८ हजारांवर पोहोचली आहे.
आठवडाभरापूर्वीची स्थिती
रुग्ण : ६५,१३८
मृत्यू १४१०
सक्रिय रुग्ण : ४८९२
रिकव्हरी रेट ९०.६९
चाचण्या : ४८९४५४
मंगळवारपर्यंतची स्थिती
रुग्ण : ७२५७५
मृत्यू : १४५५
सक्रिय रुग्ण : ८०९३
रिकव्हरी रेट ८६.८४
चाचण्या : ५२८२३४
शंभराने गंभीर रुग्ण वाढले
गेल्या आठवडाभरात गंभीर रुग्णांचे प्रमाण १०३ ने वाढले आहे. आठवडाभरापूर्वी १४३ रुग्णांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. १६ मार्चला हीच संख्या २४६ वर पोहोचली होती.
१० मार्चपासून विस्फोट रुग्ण कंसात मृत्यू
१० मार्च : ९८३ (६)
११ मार्च : ९५४ (६)
१२ मार्च : ९८२ (५)
१३ मार्च : ९८६ (६)
१४ मार्च : ९७९ (६)
१५ मार्च : ९९२ (५)
१६ मार्च : ९५६ (६)