जळगाव : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील जळगाव शहरातून जाणा:या 15.4 कि.मी.लांबीच्या मार्गाच्या चौपदरीकरणासह समांतर रस्त्याच्या कामाचा 450 कोटी रुपयांचा डीपीआर (सविस्तर प्रकल्प अहवाल) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने तयार केला आहे. प्रस्तावित कामात गिरणानदीवर दोन समांतर पुल, रेल्वे ओव्हरब्रीज, 10 ठिकाणी व्हेईकल अंडरपास मार्ग तसेच 20 ठिकाणी पादचा:यांसाठी भुयारी मार्गीका तयार करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक अरविंद काळे, प्रकल्प व्यवस्थापक अरविंद गंडी, प्रकल्प सल्लागार अजय पोफाळकर यांनी बुधवारी जळगाव शहरातील महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे सादरीकरण केले. यावेळी जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके उपस्थित होते.मनपा हद्दीतील 15.4 कि.मी.चे काँक्रीटीकरणतरसोद ते पाळधी फाटा या जळगाव महापालिका हद्दीतील रस्त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. या रस्त्याची रुंदी 60 मीटर असणार आहे. 60 मीटर रुंदीची जागा 10 कि.मी.उपलब्ध आहे. त्यानुसार या रस्त्यासाठी गिरणा नदीवर दोन समांतर पुल, रेल्वे ओव्हरब्रीजच्या बांधकामाचा समावेश राहणार आहे.स्वच्छतागृहे व पोलीस मदत केंद्रजिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी रस्त्यांच्या दिव्यांसाठी सौर उज्रेचा वापर करण्याची सूचना केली. रस्त्याच्या कडेला ठराविक अंतरावर स्वच्छतागृहे, पोलीस मदत केंद्र तयार करण्याची सुचना केली. या कामांसाठी 450 कोटी रुपयांची रक्कम प्रस्तावित आहे.30 ठिकाणी भुयारी मार्गिकामहापालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला सेवा रस्ते तयार करण्यात येणार आहे. त्यासोबत 10 ठिकाणी वाहनांसाठी भुयारी मार्ग तर 20 ठिकाणी पादचा:यांसाठी भुयारी मार्गिका राहणार आहे. यासह आकाशवाणी चौक व आयटीआयजवळ लोअर्ड हायवे करण्यात येणार आहे.दोन्ही बाजूला 7 मीटरचा सव्र्हीस रोडकालंकादेवी चौकात फ्लाय ओव्हर प्रस्तावित करण्यात आला आहे. यासह रस्त्याच्या दोन्ही बाजूंना 7 मीटरचा सव्र्हीस रोड राहणार आहे. त्यासोबतच 2 मीटरचा फुटपाथ देखील तयार करण्यात येणार आहे. यासह ज्या ठिकाणी 60 मीटर रुंद जागा उपलब्ध असेल त्या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध एलईडी पथदिवे, चौकांमध्ये हायमास्ट दिवे लावण्यात येणार आहे.शहरातील चौपदरीकरण स्वतंत्रसध्याच्या चिखली ते फागणे या राष्ट्रीय महामार्गाचे दोन टप्पे केले आहेत. त्यात तरसोद ते फागणे या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील महामार्गाचा समावेश आहे. त्यात जळगाव शहरातून जाणारा अस्तित्वातील महामार्गाचे चौपदरीकरण व त्या लगत असणा:या सव्र्हिस रोडच्या कामांचा समावेश आहे. हे काम स्वतंत्ररित्या होत आहे. मुळ कामात जळगाव शहराबाहेरून वळण रस्ता जाणार आहे. त्या व्यतिरिक्त जळगाव शहरातील रस्त्याचेही काम आता होत आहे.
महामार्गाचा 450 कोटींचा डीपीआर
By admin | Published: February 16, 2017 12:40 AM