लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे ४६ नवे रुग्ण आढळून आले आहेण ३६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील २७ वर्षीय तरूणाच्या मृत्यूची नोंद दुसऱ्या दिवशी करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव शहरात सर्वाधिक २१ रुग्ण आढळून आले आहेत.
जिल्हाभरात सोमवारी २३२४ कोरोना तपासण्या करण्यात आल्या. यात आरटीपीसीआर १२७९ तर ॲन्टीजन तपासण्या १०४५ करण्यात आल्या. दरम्यान, अद्याप ३५१८ कोरोना तपासणी अहवाल प्रलंबीत आहेत. जळगाव शहर, भुसावळ तालुक्यातील प्रत्येकी एका बाधिताच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. २७ वर्षीय तरूणाचा रविवारी पहाटे अडीच वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मृत्यू झाला होता. मात्र, रविवारच्या प्रशासकीय अहवालात या मृत्यूची नोंद करण्यात आलेली नव्हती. सोमवारी ही नोंद करण्यात आली. शहरात सोमवारी २१ नवे बाधित आढळून आले आहेत. चौघुले प्लॉट, गुजराल पेट्रोलपंप आदी भागात रुग्ण समोर आले आहेत. तर १९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.