लोकमत न्यूज नेटवर्कपाचोरा : शहरात अवैध सिगारेट विक्रीस आणल्याची खबर मिळाल्यावरून पोलिसांनी कारवाई करीत सुमारे ५ लाखांच्या सिगारेटचा साठा ताब्यात घेतल्याची घटना सिंधी कॉलनी भागात रविवारी दुपारी घडली.याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, जळगावहून पाचोºयात सिंधी कॉलनी भागात एका चारचाकीद्वारे ( क्रमांक- एम.एच- १९ सीयु ८४१८) १० खोके सिगारेट आल्याची खबर पाचोरा पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक अनिल शिंदें यांच्या मार्गदर्शनाने सपोनि सचिन बेंद्रे आणि पोउनि चौभे यांनी सहकाºयांसह सापळा रचून सिंधी कॉलनी भागातील गुलाब पंजवानी यांच्या घराजवळ सदर वाहन पकडले. वाहनातील १० खोक्यांमध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या सिगारेटची पाकिटे होती. ती पोलिसांनी तपासणी कामी ताब्यात घेतली आहेत.हा माल दीपक रमेशलाल चेतावणी ( वय १७ रा. सिंधी कॉलनी जळगाव) याने त्याचा मामा गुलाब पंजवानी यांचेकडे कसा आणला? दीपक चेतावणी याच्याकडे सदर मालाच्या पावत्या आढळून न आल्याने संशय बळावला. त्यावरून पोलिसांनी वाहनासह सिगारेट खोके ताब्यात घेतले आहे. हा माल सुमारे ५ लाख किमतीचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईची शहरात चर्चा होती.सदर व्यापाºयांकडे मालाच्या पावत्या आढळून न आल्याने संशय बळावला ंअसून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हा माल अवैध आढळल्यास गुन्हा दाखल केला जाईल असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान शहरात कुणाकडे माल विक्रीसाठी जाणार होता याबाबतचा देखील तपास सुरू आहे.
पाचोऱ्यात ५ लाखांच्या सिगारेटचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:02 AM
पाचोरा येथे एका चारचाकीतून सुमारे पाच लाखांच्या विविध कंपन्यांच्या सिगारेट आल्याची माहिती मिळाल्यानंतर शहरातील सिंधी कॉलनी भागात सापळा रचून पोलिसांनी हा माल ताब्यात घेतला आहे.
ठळक मुद्देदहा खोक्यांमध्ये भरल्या होत्या सिगारेटस्पोलिसांकडून दोघांची चौकशी