आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, दि.२७ : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे नाशिक बोर्डातील बारावीच्या १ लाख ६८ हजार २०० विद्यार्थ्यांच्या चार विषयांच्या सुमारे पाच लाख उत्तरपत्रिका तपासणीअभावी पडून आहेत. संपाबाबत लवकर तोडगा न निघाल्यास बारावीचा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी तीन वर्षात तब्बल २७ वेळा आंदोलन करण्यात आले आहे. त्यानुसार महासंघाच्या पदाधिकाºयांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत बैठक घेत आश्वासन दिले. मात्र त्यानंतरही कनिष्ठ प्राध्यापकांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे कनिष्ठ प्राध्यापकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.मुख्य नियामकांची सभा न झाल्याने संभ्रमदहावी व बारावीच्या परीक्षेच्या तयारीबाबत राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेच्या नियामकांची बैठक होत असते. या बैठकीत पुणे येथील मुख्य नियामक मार्गदर्शन करीत असतात. त्यात पेपर तपासणी, निकालाचे नियोजन याबाबत मुख्य नियामक सूचना देत असतात. मात्र संपामुळे पुणे येथील मुख्य नियामकांची बैठक न झाल्याने इयत्ता १२ वीच्या पेपर तपासणीबाबत परीक्षा नियंत्रकांना कोणत्याही सूचना नसल्याने सर्वत्र संभ्रमाचे वातावरण असल्याची माहिती सूत्रांनी दिली.जळगावसह राज्यभरातील बारावीच्या उत्तरपत्रिका पडूनजळगाव जिल्ह्यातून ५१ हजार ३०८ विद्यार्थी तर नाशिक बोर्डातंर्गत येणाºया जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यातून एक लाख ६८ हजार २०० विद्यार्थी १२ वीची परीक्षा देत आहेत. आतापर्यंत इंग्रजी, मराठी, हिंदी व भौतिकशास्त्र या चार विषयांचे पेपर झालेले आहेत. त्यामुळे एकट्या नाशिक बोर्डातील सुमारे पाच लाखांवर विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका संबधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या कस्टडीत पडून असल्याची माहिती मिळाली....तर निकाल लांबणीवर पडणारसध्या बारावीच्या परीक्षेचा निकाल १ जूनपर्यंत लावण्यात येत असतो. मात्र पेपर तपासणीबाबत लवकर निर्णय न झाल्यास यावर्षी निकाल ८ ते १० दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीसंदर्भात कनिष्ठ प्राध्यापकांचे प्रबोधन करून तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. लवकरच सकारात्मक निर्णय होईल.एम.व्ही.कदम, सहसचिव, नाशिक बोर्ड.कनिष्ठ प्राध्यापकांच्या मागण्यासंदर्भात आम्ही ३ वर्षात २७ वेळा आंदोलन केले आहे. विधीमंडळातील आमदारांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना संपाची कोंडी फोडण्यास भाग पाडावे. १२ वीच्या निकालास विलंब झाल्यास विद्यार्थी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका आहे.- सुनील गरूड,ज्येष्ठ मार्गदर्शक, जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना.