शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कारवाईच्या ढगफुटीत ५ ‘तराफे’ बुडाले! एरंडोल तहसीलदारांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 7:32 PM

महसुल प्रशासनासह सरपंच, ग्रामस्थांचाही पुढाकार

कुंदन पाटील

जळगाव : एरंडोल तालुक्यातील गिरणाकाठावरुन तराफ्यांच्या सहाय्याने वाळूचा उपसा करणाऱ्या टोळक्यांना तहसीलदारांसह सहकाऱ्यांसह सरपंच व ग्रामस्थांनी घेराव घालताच माफियांची पळापळ सुरु झाली. अधिकारी, कर्मचाऱ्यांसह काही ग्रामस्थांनी थेट पाण्यात उड्या घेत तराफ्यांचा ताबा हातात घेतला आणि उपसा केलेल्या वाळूचा गिरणा पात्रात उपस करुन तराफे जप्त केले आहेत.

गतकाळात महसुल, पोलीस प्रशासनाने जेसीबीसह डंपर, ट्रॅक्टरद्वारे यापूर्वी वाळूचा उपसा करणाऱ्यांच्या नांग्या ठेचल्या.त्यामुळे काहींनी तराफ्यांच्या मदतीने चोरट्या मार्गाने वाळूचा उपसा सुरु केला. हा प्रकार ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकातून उघड केला. त्याची तत्काळ दखल घेत एरंडोल तहसीलदार सुचिता चव्हाण सहकाऱ्यांसह गिरणाकाठी धडकल्या. तलाठी, मंडळाधिकारी,  सरपंच, ग्रामस्थांना सोबत घेत त्यांनी वाळू उपसा सुरु असलेल्या घटनास्थळी धाडी टाकल्या. तेव्हा वाळूमाफियांसह त्यांचे पंटरही पाण्यात उड्या मारत गेले आणि वाट मिळेल त्यादिशेने पळत गेले. तहसीलदारांच्या पथकाने दापोरी,खेडी,धानोरा परिसरातून  उपसा केलेल्या वाळूला पुन्हा गिरणा नदीत टाकल्यानंतर पाच तराफे ताब्यात घेतले. 

प्रशासन ‘गिरणा’काठीतहसीलदार सुचिता चव्हाण यांनी खेडी खुर्द, धानोरा, दापोरा, खेडी हद्दीतील गिरणा पात्रात धडक मोहिम राबविली. पाण्यात उतरून वाळूमाफीयांचे पाच तराफे नष्ट करण्यात आले.  या कारवाईसाठी जळगाव येथील तसेच एरंडोल तालुक्यातील २० ते २५ महसूल अधिकाऱ्यांसह पथक सरसावले होते.नायब तहसीलदार दिलीप पाटील, नायब तहसलदार किशोर माळी, मंडळ अधिकारी  मनोज शिंपी, ,मानकुंबडे, तलाठी सुरेश कटारे, नितीन पाटील,खेडी खुर्द ग्रामपंचायतचे माजी सरपंच सतीश सोनवणे, सरपंच पती नारायण सोनवणे, किशोर सोनवणे, प्रकाश कोळी, गणेश शिंदे, सुरेश सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, साहेबराव कोळी, सोमा कोळी, पन्नालाल सोनवणे यांच्यासह ग्रामस्थांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव