शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

सोशल मीडियावर ‘इसीस’चे 5 हजार एजंट- अब्दुल अंजारिया

By admin | Published: January 15, 2017 12:39 AM

जळगाव : फेसबुक, व्हॉट्सअॅप, टि¦टर या सारख्या सोशल मीडियावर इसीसचे 5 हजार एजंट कार्यरत आहेत.

जळगाव : फेसबुक, व्हॉट्सअॅप, टि¦टर या सारख्या सोशल मीडियावर इसीसचे 5 हजार एजंट कार्यरत आहेत. या साईटसवर मुलांचे अकाऊंट असेल तर समोरुन मुलीचा बनावट चेहरा दाखवून तुमच्याशी मैत्री केली जाते व त्यानंतर मुलांना संदेश पाठविले जातात. या संदेशला चुकून लाईक केले किंवा तुमचा मोबाईल क्रमांक दिला गेला तर तुम्ही अडचणीत याल, त्यामुळे अशा संदेशला लाईक करु नका असे आवाहन कौन्सील ऑफ जामा मशिद (दिल्ली) चे सल्लागार तथा इस्लामिक डिफेन्स सायबर सेलचे अध्यक्ष डॉ.अब्दुल रहेमान अंजारिया (मुंबई) यांनी केले आहे.एमआयडीसी पोलीस स्टेशन परिसरात जिल्हा पोलीस दलातर्फे अंजारिया यांचे शनिवारी ‘इसीस व दहशतवाद’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, भुसावळचे सहायक पोलीस अधीक्षक निलोत्पल व्यासपीठावर उपस्थित होते. ‘जिहाद’चा गैरअर्थ लावलाजिहादचा अनेक जणांनी गैरअर्थ लावला आहे. जिहाद मानवाच्या हक्काचे संरक्षण करण्याचे सांगते, कोणाला मारण्याचे नाही. मुसलमान हा दहशवादी होवू शकत नाही व दहशवादी हा मुसलमान असू शकत नाही. खलीफा हा संरक्षणकर्ता असतो. लोकांच्या रक्षणाची त्याची जबाबदारी असते. खलीफा हा कधीच कोणाला मारण्याचे सांगत नाही, असे अंजारिया म्हणाले.काश्मिर भारतातच राहणारकाश्मिर हे राज्य भारतात होते, आताही आहे व भविष्यातही राहिल त्यामुळे पाकिस्तानने काश्मिरचा विचार करु नये. भारतात न्याय आहे, यापूर्वीही होता व भविष्यातही            राहिल. अन्यायाच्या नावाखाली वातावरण दुषीत करणे योग्य              नाही. यावेळी अंजारिया यांनी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे                   दिली. कार्यक्रमाला चोपडय़ाचे उपअधीक्षक सदाशिव वाघमारे, मुक्ताईनगरचे उपअधीक्षक शेख, पोलीस निरीक्षक सुनील कुराडे, आत्माराम प्रधान, प्रदीप ठाकूर, प्रवीण वाडिले यांच्यासह हिंदू व मुस्लीम समाजातील प्रतिष्ठीत नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन अय्याज मोहसीन यांनी केले तर उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी आभार मानले.‘इसीस’ला लाईक करु नकासोशल मीडियावर कार्यरत असलेले इसीसचे एजंट हे स्वत:ला डॉक्टर, अभियंता असे उच्च शिक्षित दाखवतात. त्यांचा खरा चेहरा हा वेगळाच असतो. अकाऊंटधारक मुलगा असेल तर समोरुन मुलीचा चेहरा असलेला एजंट संपर्कात येतो. आपल्या हातून चूक होण्याची ते वाट पाहत असतात. तेथे आपल्याकडून चुकून मोबाईल क्रमांक दिला गेला तर त्यांच्या 100 गृपमध्ये आपल्याला समाविष्ट केले जाते. हे गृप व संदेश धोकादायक असतात, भावना भडकाविण्याचे काम त्यांच्याकडून होते, त्यामुळे अशा संदेशला तसेच इसीसला कदापीही लाईक करु नका किंवा मोबाईल क्रमांक देवू नका. तुमच्या बाबतीत असा प्रसंग घडला असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन अंजारिया यांनी केले.