ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.5 : कर्ज माफीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनांच्या वतीने 5 जून रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान जळगावातील बाजारपेठ सुरळीत सुरू होती. येथे बंदचा कोणताही परिणाम जाणवला नाही. मात्र बंदच्या दिवशी शेतक:यांनी बाजार समितीकडे पाठ फिरविल्याने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 टक्के मालाची आवक झाली. सोमवारी माल आणणारेही कमी व माल घेणारेही कमीच होते. दूध पुरवठय़ावरही परिणाम होऊन 40 हजार लिटर दूध कमी आल्याचे सांगण्यात आले.
आवक कमीच
संप मागे घेण्याचा निर्णय झाल्यानंतर जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 4 जून रोजी रविवार असल्याने माल येऊ शकला नाही. त्यानंतर 5 रोजी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याने जिल्ह्यासह मराठवाडय़ातील शेतक:यांनी बाजार समितीकडे पाठ कायम ठेवत बहुतांश शेतक:यांनी माल आणलाच नाही. त्यामुळे सोमवारी केवळ 50 टक्के मालाचीच आवक झाली.
बाजारपेठ सुरू
जळगावातील संपूर्ण बाजारपेठ सोमवारी सकाळपासून सुरळीत सुरू होती. दररोजच्या वेळेवर सर्व दुकाने उघडली गेली. यामध्ये दाणाबाजारातील दुकानांसह बोहरी गल्ली, सुभाष चौक, सुवर्ण बाजार, गोलाणी मार्केट, फुले मार्केट तसेच औषधी दुकाने सुरू होती.