धरणगाव, जि.जळगाव : शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी वितरीत करण्यासाठी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या वितरण व्यवस्थेत बदल करुन शहरातील नवीन पाईप लाईन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्तावित असून, या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.धरणगाव पालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्र, प्रशासकीय इमारत, नूतन जलकुंभ व दोन स्मशानभूमी लोकार्पण सोहळ्यासह १०.२३ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे लोकार्पण सोमवारी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन, कार्यक्रमाचे अध्यक्ष मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.व्यासपीठावर आमदार किशोर, पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, माजी आमदार आर.ओ.पाटील, माजी आमदार कैलास पाटील, शिवसेना जिल्हाप्रमूख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, मुख्याधिकारी सपना वसावा, शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावत, महानंदा पाटील, ज्ञानेश्वर जळकेकर महाराज, प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शहरप्रमुख राजेंद्र महाजन, तालुकाप्रमुख गजानन पाटील, राजेंद्र चव्हाण, महेश खैरनार, सुरेश चौधरी, जानकीराम पाटील, समाधान पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, पी.एम.पाटील, तहसीलदार सी.आर.राजपूत, बीडीओ सुभाष जाधव, सुनील महाजन, जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, गोपाल चौधरी, अनिल पाटील, पं.स.सदस्य मुकूंदराव नन्नवरे, शिवसेना गटनेते विनय भावे, भाजपा गटनेते कैलास माळी यांच्यासह सर्व नगरसेवक, शिवसेना, युवासेना,पदाधिकारी, कार्यकर्ते आदी मान्यवर उपस्थित होते. न.पा.चे सर्व नगरसेवकांच्या हस्ते, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.प्रास्ताविक जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी करुन पार्श्वभूमी मांडली.यावेळी बोलतांना ग्रामविकास राज्यमंत्री भुसे म्हणाले की, जळगाव ग्रामीण मतदारसंघात कोट्यवधींच्या विकास कामांमुळे गुलाबराव पाटील हे विकासाचे महामेरू झाले आहेत. राज्य शासनामार्फत समाजातील वंचित, दुर्बल घटकातील नागरीकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.यावेळी सुरेशदादा जैन, किशोर राजे निंबाळकर यांनी न.पा.ने केलेल्या कामांचे कौतुक केले.विशेष सत्कारयावेळी शहराच्या विकासात योगदान देणाºया सर्व माजी नगराध्यक्षांचा तसेच पाणीपुरवठा योजनेसाठी सरकारला आत्मदहनाचा इशारा देणारे माजी उपनगराध्यक्ष उमेश महाजन यांचा, जलशुध्दीकरण केंद्रासाठी १० वर्षांपासून केस लढविणारे विजय शुक्ला, चित्रकार योगेश सुतार, ठेकेदार सास्ते पाटील, इंजिनियर अलीम शिरपूरकर, किरण पाटील, भगवान महाजन, मोहन महाजन यांचा विशेष सत्कार कराण्यात आला.सूत्रसंचालन अभिजित पाटील यांनी, तर आभार विजय महाजन यांनी मानले. कार्यक्रमाला तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमस्थळी भव्य शामियाना व स्व.बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार उभारले होते. योगेश सुतार या चित्रकाराने काढलेल्या छत्रपती शिवरायांच्या तैलचित्राचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण ढोल व ताशांच्या व फटाक्यांच्या आतषबाजीत करण्यात आले.कॅन्सरग्रस्त असलेले नगराध्यक्ष सलीम पटेल यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांचा नामोल्लेख करुन सलीम पटेल यांची धरणगावचा लूक बदलण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाल्याचे समाधान असल्याचे सांगताच सभास्थळ भावूक झाले होते.
धरणगाव शहराला पिण्याचे पाणी वितरणासाठी ५० कोटी रुपयांच्या प्रस्तावास लवकरच मंजूरी मिळणार- सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 1:13 AM
धरणगाव शहरातील नागरिकांना पिण्याचे पाणी वितरीत करण्यासाठी शहरातील पिण्याच्या पाण्याच्या वितरण व्यवस्थेत बदल करुन शहरातील नवीन पाईप लाईन करण्यासाठी आवश्यक असलेल्या ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्तावित असून, या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची माहिती सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
ठळक मुद्देधरणगावला जलशुध्दीकरणासह १० कोटीच्या विकास कामांचे लोकार्पणनगराध्यक्ष सलीम पटेल यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवलीकार्यक्रमाला तालुक्यातील हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित