आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १९ - अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहन आणि सराफ बाजारासह घर खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे ४५ ते ५० कोटी रुपयांची उलाढाल झाली असावी, असे जाणकारांनी सांगितले.अक्षय्यतृतीयेला केलेली खरेदी अक्षय असते, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी विविध वस्तूंच्या खरेदीला ग्राहक पसंती देतात. त्यात सुवर्ण व जमीन-जुमला खरेदीला अधिक महत्त्व असते. बँका व पतपेढ्या आणि खाजगी वित्त संस्थांकडून शून्य टक्के व्याजाने आणि कमीत कमी कागदपत्रांच्या आधारे होणारा व्याजपुरवठा यामुळे बाजारपेठेत चैतन्य जाणवले.वाहन बाजारात धूमकार बाजारात उत्साह दिसून आला. दिवसभरात १००वर चारचाकींची विक्री झाली. शहरातील एकाच शोरुममध्ये ६० गाड्यांची विक्री झाली. ७ ते १० लाख रु.दरम्यानच्या या गाड्यांना व त्यातही डिझेलवरील वाहनांना जास्त पसंती होती. दुचाकी बाजारात तर मोठी उलाढाल होऊन नवीन ५०० दुचाकी रस्त्यावर आल्या. यात १५० सीसीला अधिक पसंती दिसून आली. सोबतच १००, १२५ सीसीलाही मागणी होती. सुमारे ५०० वाहनांची विक्री झाली.एसीला वाढली मागणीसध्या उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांचा एसीकडे वाढत आहे. गुढीपाडव्यापाठोपाठ आता अक्षय्यतृतीयेलादेखील एसीला सर्वाधिक मागणी राहिली. या सोबतच फ्रीजलाही चांगली मागणी राहिली. सोबतच एलईडी, ओव्हन यांनादेखील मागणी होती, असे विक्रेत्यांनी सांगितले.‘रिअल इस्टेट’मध्ये उत्साहअक्षय्यतृतीयेला घर खरेदी अथवा बुकिंग करण्याकडेही कल असतो. त्यानुसार आज अनेकांनी घरांची पाहणी करून घर बुक केले तर ज्यांनी घेऊन ठेवले होते, त्यांनी गृहप्रवेश केला. घर खरेदीकडे कल वाढल्याचे सांगण्यात आले.घर खरेदीकडे अनेकांचा कल वाढला आहे. नवीन घरांमध्ये वाढत्या व दर्जेदार सुविधांमुळे ग्राहक आकर्षित होत आहे. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर चांगला प्रतिसाद राहिला.- विनय पारख, बांधकाम व्यावसायिकचारचाकी वाहन बाजारात चांगला प्रतिसाद राहिला. महिनाभरातील तुलनेत अक्षय्यतृतीयेला गाड्यांची चांगली विक्री झाली. एकाच दिवसात ६० कारची डिलिव्हरी दिली.- उज्ज्वला खर्चे, विक्री व्यवस्थापक.दुचाकी विक्रीला आज चांगला प्रतिसाद राहिला. अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.-अमित तिवारी, महाव्यवस्थापक.
अक्षय्यतृतीयेला जळगावात ५० कोटींची उलाढाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:04 PM
५०० दुचाकींची विक्री
ठळक मुद्दे१०० वर चारचाकी रस्त्यावरवाहन बाजारात धूम