राज्यातील ५० लाख महिलांना लखपती दीदी बनविणार - अजित पवार
By अमित महाबळ | Updated: August 25, 2024 13:19 IST2024-08-25T13:18:45+5:302024-08-25T13:19:14+5:30
लखपती दीदी मेळाव्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला.

राज्यातील ५० लाख महिलांना लखपती दीदी बनविणार - अजित पवार
जळगाव - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या लखपती दीदी मेळाव्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधला. महाराष्ट्रातील ५० लाख महिलांना लखपती दीदी बनविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जळगावात प्रचंड संख्येने आलेल्या महिलांकडून पंतप्रधानांचे स्वागत होत आहे. राजकीय जीवनात हे प्रथमच पाहत आहे. बाहेर पाऊस पडत आहे तरीही महिलांची संख्या मोठी आहे. राज्यात सर्वांच्या सहकार्याने ५० लाख महिलांना लखपती दिदी बनवायचा संकल्प करूया, असेही अजित पवार म्हणाले.