शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

५० लाखाची बेनामी ठेव प्रकरण : सुनील सूर्यवंशी व किरण पाटील यांचे एकमेकांकडे बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 1:13 PM

दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव : ग.स.सोसायटीत विभागीय अधिकारी किरण भिमराव पाटील यांच्या नावाने ठेवलेल्या बेनामी ५० लाख रुपयांच्या संपत्तीप्रकरणात अटक केलेले संस्थेचे तत्कालीन चेअरमन सुनील अभिमन सूर्यवंशी व किरण पाटील हे दोघं एकमेकांकडे बोट दाखवत असून तपासात उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक तथा तपासाधिकारी जी.एम.ठाकूर यांनी गुरुवारी न्यायालयात दिली. दरम्यान, सूर्यवंशी व पाटील या दोघांना न्यायालयाने पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.ग.स.तील बेनामी ठेव प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्या फिर्यादीवरुन बुधवारी सूर्यवंशी व पाटील या दोघांविरुध्द जळगाव शहर पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक (सुधारीत) अधिनियम सन २०१८ चे कलम १३ (१) (१) सह १२ व भादवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर दोघांना गुरुवारी न्या.डी.ए.देशपांडे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, पोलिसांकडून कागदपत्रे येताच सूर्यवंशी यांना निलंबित करण्यात येणार आहे.अपहार प्रकरणातही अमळनेर न्यायालयात दोषारोपपत्रसूर्यवंशी व त्यांच्या साथीदारांनी जिल्हा बॅँकेच्या चोपडा शाखेत बनावट दस्ताऐवज तयार करुन बनावट खाते उघडले व तेथे अपहार केल्याने त्यांच्याविरुध्द सीबीआयने चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात अमळनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे ठाकूर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दरम्यान, दोघांच्या घरझडतीत काहीच आढळून आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.युक्तीवादात आरोपींमध्येच जुगलबंदीअटकेतील दोघं संशयितांना न्यायालयात हजर केल्यानंतर सूर्यवंशी यांचे वकील सागर चित्रे यांनी यांनी या प्रकरणात आधी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी केलेली आहे. आता केवळ राजकीय द्वेषापोटी हा गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय सूर्यवंशी यांनी २०१७ मध्ये संचालकपदाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीची गरजच नसल्याने न्यायालयाला सांगितले.किरण पाटील यांची वकील प्रकाश पाटील यांनी ५० लाखाची ठेव ठेवताना व खाते उघडतानाची सही किरण पाटील यांची नाही. याआधीच्या चौकशीत तसा जबाबही दिलेला आहे. त्याशिवाय दोन कर्मचाऱ्यांनीही जबाब दिलेला असून तुम्ही किरण पाटील यांच्या नावाने ठेव ठेवू नका व त्यांची सही देखील करु नका असेही या कर्मचाऱ्यांनी सूर्यवंशींना सांगितले होते व तसा जबाबही त्यांनी दिलेला आहे. हा व्यवहार सूर्यवंशींनीच केल्याचे या कर्मचाºयांनी जबाबात म्हटले आहे.किरण पाटील यांचा या गुन्ह्याशी संबंधच नाही. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडीची गरजच नसल्याचा युक्तीवाद अ‍ॅड.पाटील यांनी केला.जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल झालेला आहे. ५० लाखाची रक्कम मोठी आहे. हस्ताक्षर नेमके कोणाचे आहे. या तपासासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचे अ‍ॅड.ढाके यांनी सांगितले. त्यानंतर न्यायालयाने दोघं संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Jalgaonजळगाव