अमळनेर, जि.जळगाव : खान्देशात उन्हाळ्याची तीव्रता एवढी वाढली आहे की, पाणी आणि चारा नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील उंटमालकांनी आपले ५० उंट कन्नड घाटाकडे स्थलांतरित केले आहेत.प्रकाशा येथील सय्यद हुसेन याने सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यात हिरवळ संपली असून, जनावरांना प्यायला पाणी शिल्लक नसल्याने चिंता वाढली होती. उंटांना प्यायला भरपूर पाणी लागते म्हणून गेल्या २० दिवसांपासून प्रकाशा येथून पायी कन्नड घाटाकडे निघाले आहेत. ४४ अंश तापमानाच्या भर उन्हातही सय्यद कुटुंबातील आठ ते दहा सदस्य उंटांबरोबर मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथे रस्त्याने पायी चालत होते.सय्यद हुसेन यांच्या कुटुंबाची उपजीविका उंटांच्या दुधावरच चालते. उंटांचे दूध ६० ते ७० रुपये लीटरने विकले जाते. मुलांची उंची वाढवण्यासाठी आणि कुस्तीच्या पहिलवानांना ताकद येण्यासाठी हे दूध वापरले जाते. अनेकांची मागणी असते. तसेच पोट पुढे आलेल्या आणि स्थूल, लहान मुलांना गुणकारी असते. एवढ्या उंटांना चारा विकत आणणे परवडत नाही म्हणून जंगलाच्या नैसर्गिक चाऱ्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु कडक उन्हाळ्यामुळे पाणी आणि चारा नसल्याने पावणे दोनशे किलोमीटर कन्नडच्या जंगलात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला पाऊस पडताच प्रकाशाकडे माघारी फिरू, असे सय्यद हुसेन याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
५० उंटांचे कन्नड घाटात स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 4:10 PM
खान्देशात उन्हाळ्याची तीव्रता एवढी वाढली आहे की, पाणी आणि चारा नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील उंटमालकांनी आपले ५० उंट कन्नड घाटाकडे स्थलांतरित केले आहेत.
ठळक मुद्देपाणी आणि चारा नसल्याने स्थलांतराची आली वेळउंटांचे दूध ६० ते ७० रुपये लीटरने विकले जाते४४ अंश तापमानातही सय्यद कुटुंबातील आठ ते दहा सदस्य उंटांच्या काफिल्याबरोबरपहिला पाऊस पडल्यानंतर परतणार स्वगृही प्रकाशाकडे