ऑनलाईन लोकमत
वरखेडे, जि. जळगाव, दि. 28 - चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबटय़ाच्या हल्ल्यात सहावा बळी गेल्यानंतर त्याला पकडण्साठी यंत्रणा सज्ज झाली असून मंगळवारी वनविभाग, महसूल विभागाचे तसेच 25 शार्पशुटर असे एकूण 50 जणांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक वरखेडे परिसरात सकाळीच दाखल झाले आहे.
चाळीसगाव तालुक्यात नरभक्षक बिबटय़ाच्या दहशतीचे सावट कायम असून तीन दिवसानंतर वरखेडे येथील तिसरा तर तालुक्यातील एकूण सहावा बळी बिबटय़ाने मंगळवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घेतला. यामुळे परिसरातील नरभक्षक बिबटय़ाच्या भीतीचा थरार कायम आहे.वरखेडे खुर्द येथील यमुनाबाई दला तिरमली या 70वर्षीय महिलेवर झोपेत बिबटय़ाने हल्ला करीत ठार केले. मंगळवारी पहाटे 3च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यानंतर वनविभागाने पथक तयार केले असून ते वरखेड परिसरात तैनात झाले आहे.