दीपक जाधव/ऑनलाईन लोकमत
शेंदुर्णी (जि.जळगाव), दि.16- जामनेर तालुक्यातील हिवरखेडा येथील अक्षय देशमुख या तरुणाचा गेल्या वर्षी बुडून मृत्यू झाल्यानंतर विद्यार्थी अपघात विम्यातून मिळालेल्या रकमेतील 50 हजारांची रक्कम एका गरीब विद्यार्थीनीच्या शिक्षणासाठी उपलब्ध करून देत अक्षयच्या वडिलांनी आपल्या मुलाला ख:या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील द्वितीय वर्ष (विज्ञान) चा विद्यार्थी अक्षय गोपाल देशमुख व त्याचा मित्र गजानन मुरलीधर सोनवणे यांचा 25 नोव्हेंबर रोजी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. देशमुख व सोनवणे दोघेही परिवारांचे एकुलते मुले होती.
कुलगुरुंच्या हस्ते धनादेशाची रक्कम मिळणार
महाविद्यालयाने या विद्याथ्र्याचा अपघात विमा काढलेला होता. या दुदैवी घटनेनंतर विमा कंपनी कडून मयताच्या वारसांना 2 लाख 25 हजार रुपयांची रक्कम मंजूर झाली. उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाकडून दहा हजारांची मदत मिळाली. गरुड महाविद्यालयातील प्राध्यापकांनी 2100 रुपयांची आर्थिक मदत अशी एकूण 2 लाख 37 हजार 100 रुपयांच्या रकमेचे धनादेश 17 जुलै रोजी संस्थेच्या वर्धापनदिनाच्या दिवशी उमवि विद्यापिठाचे कुलगुरू डॉ.पी.पी. पाटील व संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांच्या हस्ते गोपाल देशमुख यांना देण्यात येणार आहे.
गरीब मुलीच्या शिक्षणासाठी 50 हजारांची मदत
अक्षयचे वडील गोपाल आनंदा देशमुख यांनी विम्याच्या रकमेतील 50 हजारांची रक्कम मुरलीधर सोनवणे यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी देणार असल्याचे लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. मुलगा शिक्षण घेत असल्याने ही आर्थिक मदत महाविद्यालयाच्या प्रय}ातून मिळाली. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना शिक्षण असे आवाहन त्यांनी केले. माझा एकुलता मुलगा अक्षयचा अपघाताने मृत्यू झाला. मुलगी पुजा देशमुख इ.12वी विज्ञान शिक्षण घेत आहे. तिला आवड असेल त्या क्षेत्रात मी शिक्षणासाठी प्रोत्साहन देणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.