गुलाबराव पुढे म्हणाले की, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक महिला असल्या तरी त्यांची कामे शेतकरी हिताची आहेत. आमदार अनिल पाटील यांनी पातोंडा, मठगव्हाण , रुंधाटी , गंगापुरी ,मुंगसे ,दापोरी परिसरातील हजारो एकर शेतीतील वर्षानुवर्षाची पाण्याचा निचरा न होण्याची समस्या सांगून त्यावर विशेष योजना तयार करण्याची विनंती केली तर माजी आमदार साहेबराव पाटील यांनी २०१७ पासूनच्या नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानाचा शेतकऱ्यांचा प्रलंबित मोबदला गुलाबरावानी आणून दिल्याबद्दल त्यांचा विशेष टोपी घालून सत्कार केला. माजी आमदार दिलीप सोनवणे, इंडियन ऑईलचे अश्विन यादव, ए. जी. ट्रान्सचे एमडी अजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांनी प्रास्ताविकात अवघ्या काही महिन्यात बाजार समितीत सुरू होत असलेल्या शेतकरी हिताच्या नवनवीन योजनांची माहिती दिली.
व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख तात्या पाटील, बाजार समितीचे प्रशासक प्रा. सुरेश पाटील , महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सचिन पाटील , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ पाटील, संभाजी पाटील , जितेंद्र राजपूत , एल. टी. पाटील, भाईदास अहिरे , पातोंड्याचे भरत बिरारी , जीनचे मालक केदार पवार , बाजार समितीचे माजी संचालक हरी भिका वाणी, निवृत्त अपर पोलीस अधीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी हजर होते.
विशेष सत्कार
बाजार समितीची हायटेक यंत्रणा राबवून आयएसओ मानांकन मिळवल्याबद्दल केशवा व्हिजनचे संचालक गणेश भामरे तसेच बाजार समिती प्रकल्पांचे कामकाज व्यवस्थित हाताळून यश मिळवणारे लिपिक बापू पाटील व गणेश पाटील यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी , अनिल शिसोदे , जिल्हा किसान सेलचे अध्यक्ष सुरेश पाटील, विक्रांत पाटील , मनोज पाटील , पंस सदस्य विनोद जाधव ,भागवत पाटील, रिटा बाविस्कर , कविता पवार ,आशा चावरीया , अलका पवार , योजना पाटील हजर होते. सूत्रसंचालन व आभार संजय पाटील यांनी मानले.
पेट्रोल पंप भूमिपूजन करताना मंत्री गुलाबराव पाटील , आमदार अनिल पाटील, मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील व इतर छाया अंबिका फोटो, अमळनेर.