जळगाव - नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत अंतर्गत पोकरा ही योजना २०१८ पासून राबविण्यात येत असून, या योजनेतून शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय करण्याकरिता आर्थिक सहाय्य पुरविण्यात येत असते. गेल्या पाच वर्षात जळगाव जिल्ह्यातील ७० हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, त्यासाठी शासनाकडून तब्बल ४९९ कोटी २१ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धत देखील बदलत जात आहे. पोकरा योजनेतंर्गतगावातील शेतकरी गटांनी कृषी अवजारे बँक, शेडची उभारणी या सामुदायिक घटकांसाठी २० लाख रुपयांपर्यंत प्रस्ताव सादर करता येतो. याचप्रमाणे शेतीमालावर आधारित प्रक्रिया केंद्र, गोदाम यासारखे सामूहिक घटकांसाठी प्रस्ताव करता येतात. योजनेअंतर्गत विविध घटकांसाठी ६० टक्के पासून ते ८० टक्केपर्यंत अनुदान मिळते. गेल्या पाच वर्षात जळगाव जिल्ह्यातील तब्बल ७० हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
विभागनिहाय पात्र शेतकरी व मिळालेले अनुदानविभाग - लाभार्थी शेतकरी - मिळालेले अनुदानजळगाव उपविभाग - २१ हजार ७७३ - १५१ कोटीपाचोरा - १७ हजार १०१ - १०६ कोटी ११ लाखअमळनेर उपविभाग - ३१ हजार ४२७ - २४२ कोटी ७५ लाख
जिल्ह्यासाठी पोकरा योजना थोडक्यात..१. पोकरा योजनेत जळगाव जिल्ह्यातील ६० गाव समुहातील १५ तालुक्यातील ४६० गावांची निवड करण्यात आली आहे.२. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख २ हजार ९९३ शेतकऱ्यांनी पोकरा योजनेसाठी नोंदणी केली आहे.३. त्यापैकी ७० हजार ३०१ शेतकऱ्यांना ४९९ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले आहे.४. तर ४ हजार ९११ शेतकऱ्यांचे ४४ कोटी रुपयांचे अनुदान अंतीम टप्प्यात आहे.