जळगाव : मनपा निवडणुकीतील उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आॅनलाईन प्रचाराचे पॅकेज किमान ५ लाखांपर्यंत काही कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे. अगदी सांगली-मिरज निवडणुकीचे काम घेतलेल्या पुण्याच्या कंपनीने जळगावातही ग्राहक शोधणे सुरू केले आहे. प्रचारफेरीत गर्दीसाठी ५०० रूपये रोजाने माणसेही पुरविण्याची तयारी या कंपनीने ठेवली असून अनेक उमेदवारांकडून त्यासाठी होकारही दर्शविण्यात आला आहे.यंदाच्या मनपा निवडणुकीत प्रभागांची रचना मोठी झाली असून एकाच प्रभागातून चार उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यामुळे पूर्वीच्या दोन प्रभाग मिळून एक प्रभाग झाला आहे.एवढ्या मोठ्या प्रभागात पोहोचण्यासाठी तुलनेने प्रचाराला जेमतेम दोन आठवड्यांचा कालावधी उमेदवारांना मिळणार असल्याने यंदा आॅनलाईन प्रचारावरच उमेदवारांचा अधिक भर राहणार आहे. हेच हेरून पुण्याची एक कंपनी देखील या प्रचार कार्यात उतरली आहे.कंपनीचे प्रतिनिधी पक्ष कार्यालयांमध्ये फिरून उमेदवारांना गाठून आॅनलाईन प्रचाराचे पॅकेज चार ते पाच लाखांत उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवित आहे.काय आहे पॅकेज?या आॅनलाईन प्रचारासाठी कंपनीकडून खास तयार केलेले सॉफ्टवेअर उमेदवाराला दिले जाणार असून संबंधीत प्रभागातील उमेदवारांची यादी फोननंबरसहीत उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच त्याचा वापर करण्यासाठी मॅनपॉवरही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्याद्वारे उमेदवारांना थेट एसएमएसद्वारे संपर्क साधून मतदानाचे आवाहन करता येणार आहे. तसेच व्हॉटस्अॅप, फेसबुक आदी सोशलमीडियावर प्रचारासाठीही मदत केली जाणार आहे. त्यासाठीचे प्रचारसाहित्यही उमेदवाराला तयार करून दिले जाणार आहे. मतदानाच्या दिवशी बुथवर मदतीसाठी देखील कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.याखेरीज स्थानिक मक्तेदारही उमेदवारांना रॅलीसाठी, प्रचारासाठी माणसे पुरवित असतात. सकाळी घरातून निघाले की उमेदवार नाश्ता, पाण्याची सोय करतो. त्यानंतर दिवसभर प्रभागात फिरून प्रचार करायचा आणि पैसे घेऊन सायंकाळी घरी परतायचे असा काहींचा दिनक्रमच होऊ जातो.
जळगावात प्रचारफेऱ्यासाठी ५०० रूपये रोज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 2:02 PM
मनपा निवडणुकीतील उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आॅनलाईन प्रचाराचे पॅकेज किमान ५ लाखांपर्यंत काही कंपन्यांकडून उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ठळक मुद्देआॅनलाईन प्रचार ५ लाखातप्रचार कंपन्यांकडून ग्राहकांचा शोधअनेक उमेदवारांकडून प्रचारासाठी होकार