शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

७२ तासांत ५१ हजार बॅनर्स, पोस्टर्स हटवले!

By अमित महाबळ | Updated: March 21, 2024 16:03 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमाची घोषणा दि. १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने केल्यानंतर आचारसंहितेला सुरुवात झाली आहे.

जळगाव : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र आदर्श आचारसंहिता सुरू झाली असून, जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात आचारसंहितेची घोषणा झाल्यापासून ७२ तासांत ५१ हजारपेक्षा अधिक बॅनर्स, पोस्टर्स प्रशासनाने हटवले आहेत. 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या कार्यक्रमाची घोषणा दि. १६ मार्च रोजी निवडणूक आयोगाने केल्यानंतर आचारसंहितेला सुरुवात झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येत आहे. जळगाव लोकसभा मतदार संघ क्षेत्रात ३१ हजार ५६२ तर रावेर लोकसभा मतदारसंघात २० हजार १६६ विविध राजकीय पक्षांचे बॅनर्स, पोस्टर्स, कट आउट, फ्लेक्स, झेंडे, स्टिकर्स हटवण्यात आले आहेत. कोनशिला झाकण्याची कार्यवाही देखील करण्यात आली असल्याची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुखांनी दिली आहे.

दोन मतदारसंघात फलकांचा महापूर आवरला...आदर्श आचारसंहितेची घोषणा झाल्यानंतर २४ तासांत जळगाव लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या जळगाव शहरातून ५५, जळगाव ग्रामीण मतदार संघातून २३४७, अमळनेर विधानसभा मतदारसंघातून ४०७, एरंडोल विधानसभा मतदारसंघातून २९१,  चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून २५१७, पाचोरा विधानसभा मतदारसंघातून २४४५ असे एकूण ८०६२ बॅनर्स, पोस्टर्स, झेंडे हटविण्यासोबतच कोनशीला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली. 

रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा विधानसभा मतदारसंघातून १५९६, रावेर विधानसभा मतदारसंघातून ८३१, भुसावळ विधानसभा मतदारसंघातून ५८६, जामनेर विधानसभा मतदारसंघातून २९३१, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून ४२, तर मलकापूर विधानसभा मतदारसंघातून ९८४ असे एकूण ६,९३४ बॅनर्स, झेंडे,पोस्टर्स तसेच कोनशिला झाकण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकBanerबाणेर