जळगाव : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यापासून बंद असलेली बससेवा गुरुवारपासून पुन्हा सुरू झाली़ पहिल्या दिवशी सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जळगाव आगाराला यातून ९ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. जळगावसह जिल्ह्यातील आगारांमधून दिवसभरात ३६९ फेºया झाल्या. यातून १ लाख ५१ हजारांचे उत्पन्न मिळाले़ शहरातून वाजत गाजत धुळ्याला बस रवाना करण्यात आली़महामंडळाने २२ मे पासून जिल्हा अंतर्गत बससेवा सुरू केली होती. मात्र, या सेवेला प्रवाशांचा अत्यत अल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे अनेक आगारांनी ही सेवा लगेच बंद केली होती. त्यानंतर आता महामंडळाने २० आॅगस्टपासून राज्यभरात आंतरजिल्हा बस सेवेला परवानगी दिली. त्यानुसार महामंडळाच्या जळगाव आगारासह जिल्हाभरातील आगारांमधून गुरुवारी सकाळी सात वाजेपासून बाहेरगावी बस सोडण्यात आल्या.पहिली बस चोपड्यालाजळगाव आगरातून सकाळी सात वाजता पहिली बस चोपड्याला सोडण्यात आली. यात सात प्रवाशांनी प्रवास केला. त्यानंतर धुळे, औरंगाबाद, अमळनेर या ठिकाणी बस पाठविण्यात आल्या. दुपारी बारापर्यंत प्रवाशांचा या सेवेला अल्प प्रतिसाद असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दुपार नंतर प्रवाशांची संख्या वाढली़ धुळे, औरंगाबाद, शिरपूर, मालेगाव यासह इतर ग्रामीण भागातल्या मार्गावर दर तासाला बसेस् सोडण्यात आल्या.वाजत-गाजत बससेवा सुरूसेवेचा पहिला दिवस असल्याने जळगाव आगारातून वाजत-गाजत सेवा सुरू करण्यात आली. जळगाव ते धुळे या बसमध्ये २२ प्रवासी मिळाल्याने, या बसला ढोल व ताशांच्या गजरात धुळ््याला रवाना करण्यात आले. यावेळी वाहतूक अधीक्षिका नीलिमा बागुल यांच्याहस्ते बसची पूजा करण्यात आली. आगार व्यवस्थापक नीलेश पाटील, गोपाळ पाटील आदी उपस्थित होते.बससेवेच्या पहिल्या दिवशी जळगावसह इतर आगारांमध्ये दुपारनंतर सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धुळे, औरंगाबाद या ठिकाणीदेखील बसेस सोडण्यात आल्या व त्या जिल्ह्यातील बसदेखील इकडे आल्या. लवकरच पूर्वी प्रमाणे प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल.-राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव
पहिल्या दिवशी बसच्या ५२ फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 11:53 AM