शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

‘अवकाळी’ची ५५२ हेक्टर क्षेत्राला नुकसानीची कळ! महिला जखमी, तीन तालुक्यातील ११२६ शेतकरी बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 7:41 PM

रविवारी वादळ आणि गारपिटीसह जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेर या तीन तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

जळगाव : गारपीट आणि वादळासह रविवारी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रावरच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक नुकसान कांद्याचे झाले आहे. वीज पडल्याने एक महिला जखमी झाली आहे. दोन गायींसह एक म्हैसदेखिल वीज पडल्याने ठार झाली आहे. एका दिवसाच्या अवकाळी पावसाने ११२६ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.

रविवारी वादळ आणि गारपिटीसह जिल्हाभरात दमदार पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाचोरा, चाळीसगाव आणि जामनेर या तीन तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.

भडगावची महिला जखमीभडगाव तालुक्यातील आडळसे येथील प्रतीक्षा गणेश साळुंखे ही महिला वीज पडल्याने जखमी झाली आहे. तर, सत्रासेन (चोपडा) येथील सुभाष संजय पाटील आणि मुक्ताईनगरच्या घोडसगावमध्ये एका घराचे अंशत: नुकसान झाले आहे.

पशुधनांचा बळीवीज पडल्याने सामरोद (जामनेर) येथील सुनील धनराज पाटील यांच्या मालकीची एक म्हैस जागीच ठार झाली. तर चाळीसगावच्या शिरसगावात निंबा भिकन चव्हाण यांच्या मालकीच्या दोन गायींचा मृत्यू झाला आहे.

पिकांचे नुकसानपाचोऱ्यातील ३, चाळीसगावची १० आणि जामनेरच्या ४२ गावांना या पावसाचा फटका बसला आहे. जिल्ह्यात ५५ गावांना फटका बसला आहे.

तालुकानिहाय पिकांचे नुकसान (हेक्टरमध्ये) -तालुका-हरभरा-गहू-मका-ज्वारी-कांदा-भाजीपाला-केळी-पपई-फळपिकेपाचोरा-००-००-००-००-००-००-०४-००-०३चाळीसगाव-३८-३९-७८-७५-२१६-००-००-००-००जामनेर-२३-२१-१७-११-००-०७-१४-००-०६दृष्टीक्षेपात नुकसानबाधीत गावे-५५बाधीत शेतकरी-११२६नुकसान क्षेत्र (हे)-५५२जनावरांचा मृत्यू-०३घरांची पडझड-०२जखमी-०१ 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरीCropपीक