महागाईविरोधात धक्का मारो आंदोलन
जळगाव : पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, वीज बिल व खाद्यतेलांच्या दरवाढीविरोधात बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व महिला आघाडी जळगाव जिल्हा शाखेच्यावतीने आज, मंगळवारी स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकाळी ११ वाजता धक्का मारो आंदोलन करणार आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा बहुजन मुक्ती पार्टीचे विजय सुरवाडे यांनी केले आहे.
किशोर नेवे यांची निवड
फोटो क्रमांक १५ सीटीआर ०९
जळगाव : केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या सल्लागारपदी किशोर गजानन नेवे यांची निवड करण्यात आली. तालुकाध्यक्ष किशोर पाटील यांनी हे नियुक्ती पत्र दिले. या निवडीचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.
पालक-शिक्षक संंघाची सभा
जळगाव : नवीन शैक्षणिक वर्षात आनलाईन शिक्षणासह विविध शैक्षणिक व इतर उपक्रमांविषयी गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्या मंदिराची पालक-शिक्षक संघाची सभा झाली. मुख्याध्यापिका रेखा पाटील, शालेय समन्वयक चंद्रकांत भंडारी यांनी मार्गदर्शन केले. सचिव सरला पाटील यांनी आभार मानले.
उपनगर घोषित करा
जळगाव : शिवाजीनगर व परिसराला छत्रपती राजे शिवाजी शहाजीराजे भोसले या नावाने उपनगर घोषित करावे, अशी मागणी रिपाइं खरात गटातर्फे शहर युवक अध्यक्ष मुकेश कोचुरे यांनी केली आहे. याविषयी मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात आले.