विजयकुमार सैतवालजळगाव : यंदा जिल्ह्यात केवळ ६७.४ टक्केच पाऊस झाला असून पावसाळ््यातील चार महिन्यांमधील तब्बल ५६ दिवस पाऊसच झाला नाही. त्यामुळे निम्मा पावसाळा कोरडाच गेला. यंदा तब्बल तीन वेळा पावसाने एकूण ३२ दिवस खंड दिला असून ३ वर्षानंतर पुन्हा ७० टक्केच्या आतच पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, शासकीय पावसाळा आज, ३० सप्टेंबर रोजी संपला.पावसाळ््याच्या सुरुवातीपासूनच यंदा वरुणराजाने सर्वांची चिंता वाढविली व शेवटपर्यंत कायम राहिली. यामध्ये केवळ आॅगस्ट महिन्यातील दमदार पाऊस दिलासा देऊन गेला. मात्र अखेरपर्यंत पावसाची आकडेवारी ६८ टक्क्यापर्यंतदेखील पोहचू शकली नाही. जून महिन्याचा पहिला दिवस कोरडा गेल्यानंतर २ जून रोजी केवळ रावेर व चाळीसगाव तालुक्यात पावसाने हजेरी लावली, मात्र तीदेखील नोंद होण्यासारखी नव्हती. त्यानंतर मात्र ३ जून रोजी जिल्हाभरात एकाच दिवसात १०७.४ मि.मी. पाऊस झाला व सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र पुन्हा पावसाची दांडी सुरूच राहिली. अखेर २३ जून रोजी जिल्हाभरात २१७.५ मि.मी. पावसाची एकाच दिवसात नोंद झाली. यंदाच्या पावसाळ््यात प्रथमच दोन आकडी टक्केवारी (१०.७ टक्के) गाठली. त्यानंतर १८ दिवसांनी ११ जुलै रोजी २७८.७ मि.मी. पावसाची नोंद झाली.अडीच महिन्यानंतर गाठली पन्नाशी१६ आॅगस्ट पर्यंत केवळ ३९.९ टक्के पावसाची नोंद असताना १७ आॅगस्ट रोजी जिल्हाभरात जोरदार पाऊस होऊन एकाच दिवसात ११२१.९ मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने एका दिवसात पावसाची टक्केवारी ११.३ टक्क्याने वाढून ५१.२ टक्के एकूण पावसाची नोंद झाली व यंदाच्या पावसाळ््याने पन्नाशी गाठली. त्यानंतर जोरदार पावसाने जी पाठ फिरविली ती शेवटपर्यंत कायम राहिली. यादरम्यान केवळ २१ आॅगस्ट रोजी ५४० मि.मी., २२ आॅगस्ट रोजी २५८.१ मि.मी., २२ सप्टेंबर रोजी ३२०.४ मि.मी. असे केवळ तीनच दिवस दमदार पाऊस झाला.तीन वेळा खंड२.५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच पाऊस झाल्याचे मानले जाते. यंदा पावसाळा सुरू झाल्यानंतर एकूण ५६ दिवस पाऊस झालाच नाही. यामध्ये ११ ते १७ जून असे सात दिवस पाऊस नव्हता. त्यानंतर २७ जुलै ते ९ आॅगस्ट असे १४ दिवस, त्यानंतर ६ ते १६ सप्टेंबर दरम्यान असे ११ दिवस पावसाने खंड दिला.पाच वर्षात दुसऱ्यांदा कमी पाऊसगेल्या पाच वर्षांची पावसाची आकडेवारी पाहता दुसºयांदा ७० टक्केच्या आत पाऊस झाला आहे. यामध्ये केवळ २०१४ व २०१६मध्ये पावसाने नव्वदी पार केली आहे. यात २०१४मध्ये ९२.८ टक्के व २०१६मध्ये ९५.९ टक्के पावसाची नोंद झाली. मात्र २०१५मध्ये केवळ ६४.४ टक्के व त्यानंतर यंदा २०१८मध्ये पुन्हा ६७.४ टक्केच पाऊस झाला. गेल्या वर्षी २०१७मध्येदेखील ७२.६ टक्केच पाऊस झाला होता.गेल्यावर्षीपेक्षा ५.२ टक्क्याने कमी पाऊसगेल्या वर्षी २०१७मध्ये ७२.६ टक्के पाऊस झाला होता. त्यात पुन्हा घट होऊन यंदा ५.२ टक्क्याने पाऊस कमी झाला व हा आकडा ६७.४ टक्क्यांवर आला.एरंडोल व धरणगाव तालुक्यावरच कृपादृष्टीयंदाची तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पाहता केवळ एरंडोल तालुक्यात ८८.९ टक्के अशी सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून त्या खालोखाल धरणगाव तालुक्यात ८४ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर पारोळा तालुक्यात ७९.३ टक्के, बोदवड तालुक्यात ७५.१ टक्के व रावेर तालुक्यात ७१.५ टक्के पावसाची नोंद झाली. इतर तालुक्यात मात्र ७० टक्केच्या आतच पाऊस झाला आहे.२९ सप्टेंबर अखेर तालुकानिहाय झालेला पाऊसतालुका एकूण पाऊसजळगाव ६३.४जामनेर ६४.६एरंडोल ८८.९धरणगाव ८४भुसावळ ५५यावल ५६.७रावेर ७१.५मुक्ताईनगर ६०.४बोदवड ७५.१पाचोरा ६२.९चाळीसगाव ६६.७भडगाव ६१.१अमळनेर ५७.४पारोळा ७९.३चोपडा ६६.६एकूण ६७.४ (पाऊस टक्केवारीत)
जळगाव जिल्ह्यात पावसाळ््यातील १२१ दिवसांपैकी ५६ दिवस वरुणराजाचा रुसवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:09 PM
निम्मा पावसाळा कोरडाच
ठळक मुद्देतीन वेळा ३२ दिवसांचा खंडतीन वर्षांनंतर पुन्हा ७० टक्केच्या आत पाऊस