शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे ५७ हजाराची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 4:26 PM

तालुक्यातील कुसुंबा येथे राजेश विश्वांभर वाणी (वय ३६ रा.मोरया नगर, कुसुंबा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल व पेनड्राईव्ह असा ५७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे रोख रक्कम, दागिने, लॅपटॉप लांबविले एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखलबंद घराचे कुलुप तोडले

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,८ : तालुक्यातील कुसुंबा येथे राजेश विश्वांभर वाणी (वय ३६ रा.मोरया नगर, कुसुंबा) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम, सोने-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाईल व पेनड्राईव्ह असा ५७ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कुसुंबा येथे राहणारे राजेश वाणी हे खासगी कंपनीत मार्केटींगचे काम करतात. पत्नी विद्या, आई निर्मलाबाई व मुलगी असे एकत्र राहतात. आई ६ रोजी फत्तेपूर येथे नातेवाईकाकडे गेलेली आहे तर पत्नी आठवडाभरापासून माहेरी आहे. राजेश यांनी कंपनीचे काम असल्याने ते बुधवारी औरंगाबाद येथे गेले होते. त्यामुळे घराला कुलूप होते. गुरुवारी सकाळी घराचे कुलूप तुटलेले असल्याची माहिती शेजारी राहणाºया कल्पना तायडे यांनी राजेश यांना दिली. त्यामुळे त्यांनी तातडीने जळगाव गाठले. घरातील सामान अस्ताव्यस्त झालेला होता तर कपाटातील १५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे सिक्के, १२ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ५ हजार रुपये किमतीचा सिक्का, १४ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप व मोबाईल, दहा हजार रुपये रोख व एक हजार रुपये किमतीचे पेनड्राईव्ह असा ऐवज गायब झाल्याचे लक्षात आले. घराची पाहणी केल्यानंतर वाणी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.