युवा मोर्चा सरचिटणीस ललित बराटे, भूषण पाटील, सुदाम राजपूत, समाधान सपकाळे, दीपक पाटील, पवन पाटील, कुणाल वाणी, हर्षल इंदलकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. रेड प्लस रक्तपेढी यांचे सहकार्य लाभले.
नवनाथनगर येथे वृक्षारोपण
जळगाव : कोल्हे हिल्स परिसरातील नवनाथनगर येथे भानुदास जोशी व भावना जोशी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कडूनिंबाची वृक्ष भानुदास जोशी यांच्या हस्ते लावण्यात आले. यावेळी जिल्हा मूकबधिर संघटनेचे सहसचिव शशिकांत जोशी, घन:श्याम सैनी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात शासकीय लसीकरण केंद्र सुरू करा
जळगाव : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शासकीय लसीकरण केंद्र नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. यासाठी जिल्ह्यात शासकीय कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जेवढ्या लस उपलब्ध असतील तेवढेच कुपन वाटप करावे, यामुळे नागरिकांचे हाल होणार नाहीत असेही आ. भोळे यांनी म्हटले आहे.
शालेय शुल्कात सूट द्या
जळगाव : कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी शाळांकडून १०० टक्के शुल्क घेतले जात आहे. शाळेचा खर्च कमी झाला असल्याने ५० टक्के शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगराध्यक्ष आनंद सपकाळे, सरचिटणीस मिलिंद चौधरी, अक्षय जेजूरकर, महेश पाटील, युवा मोर्चा सोशल मीडिया प्रमुख भूषण जाधव आदी उपस्थित होते.
खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या निर्बंधादरम्यान अत्यावश्यक सेवेचे किराणा व भाजीपाला विक्री सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू असल्याने या वेळेत मोठी गर्दी होत आहे. गिरणा टाकी परिसरात भाजीपाला खरेदीसाठी दररोज रस्त्यावर मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीचीही कोंडी होत आहे.