लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवसेना जळगाव जिल्हा व जळगाव महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच तुकारामवाडी व शाहुनगरात हिमोग्लोबिन तपासणी व औषध वाटप शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा शहरातील ५७० महिलांनी लाभ घेऊन तपासणी केली.
तुकारामवाडीतील शिबिराचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितीन लढ्ढा, महानगर प्रमुख शरद तायडे यांच्या हस्ते करण्यात आले. तर शाहूनगरातील शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. शाहूनगर येथे ३१२ व तुकारामवाडीत २५८ महिला शिबिरात सहभाग घेऊन हिमोग्लोबिन तपासून घेतले. या शिबिराप्रसंगी विधानसभा क्षेत्र समन्वयक राधेश्याम कोगटा, अनंत जोशी, प्रशांत नाईक, नीता सोनवणे, विराज कावडीया, अमित जगताप, विशाल वाणी, स्वप्निल परदेशी, पीयूष गांधी, जय मेहता, अंकित कासार, प्रशांत सुरळकर, जाकीर पठाण, जितू साळुंखे, मधुर झंवर, जब्बार पटेल, श्रीकांत अंगाळे, ईश्वर राजपूत, उमेश चौधरी, विश्वनाथ पाटील, अंकुश कोळी, संतोष पाटील, श्रीकांत आगळे, इकबाल शेख, रईस शेख आदी उपस्थिती होते.
यांनी घेतले परिश्रम
शिबिराच्या यशस्वितेसाठी अर्जुन भारूळे, प्रीतम शिंदे, दीपक पवार, नितीन चौधरी, मनोज मानकुंबारे, राजेश वारके, विवेक महाजन, राजेश काळे, नेमिचंद येवले, विकी काळे, सचिन पाटील, राहुल चव्हाण, गोकुळ बारी, शोएब खाटीक, अजय ठाकूर, राहुल पावसे, योगेश कोळी, अक्षय सोनवणे, मंदार सोनवणे, आकाश साळुंखे आदींनी परिश्रम घेतले.