नंदुरबार : जिल्ह्यातील 231 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्जाचा अक्षरश: पाऊस पडला. तब्बल पाच हजार 783 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सोमवार, 4 एप्रिल रोजी अर्जाची छाननी होणार आहे. दरम्यान, बोरपाडा, ता.नवापूर येथील ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज आला नाही. ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी शनिवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. सकाळपासूनच तहसील कार्यालयांमध्ये इच्छूक, त्यांचे समर्थक व गावक:यांची गर्दी झाली होती. सायंकाळी साडेपाच वाजेर्पयत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. अक्कलकुवा तालुक्यात 13 ग्रामपंचायतीसाठी 529, धडगाव तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींसाठी 612, तळोदा तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींसाठी 727, नंदुरबार तालुक्यातील 38 ग्रामपंचायतींसाठी 917, नवापूर तालुक्यात 63 ग्रामपंचायतींसाठी 1,493 तर शहादा तालुक्यातील 69 ग्रामपंचायतींसाठी 1,505 अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, बोरपाडा, ता.नवापूर येथील ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. यंदाही ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला आहे.
231 ग्रामपंचायतींसाठी 5,783 उमेदवारी अजर्
By admin | Published: April 03, 2016 3:49 AM